मसाला व्यवसायात देशातील एक अग्रगण्य ब्रॅण्ड महाशिया दी हट्टी (MDH) चे संस्थापक महाशय धर्मपाल यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. गेल्या वर्षी त्यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या हस्ते पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेले महाशय धर्मपाल यांच्या पदरी फक्त ₹१५०० होते. त्यातून त्यांनी एक अग्रगण्य मसाले कंपनी उभी केली. या वयातही ते MDH मसाल्यांच्या जाहिरातीतून आपल्या भेटीला येत होते.
महाशय धर्मपाल यांचा संपूर्ण जीवनप्रवास वाचण्यासाठी हा लेख वाचा : https://udyojak.org/mahashay-dharmpal-gulati-success-story-in-marathi/
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia