दुग्ध व्यवसाय

दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक परंपरागत व्यवसाय आहे. आजही ग्रामीण भागातील बराच मोठा समाज हा या व्यवसायावर अवलंबून असतो. प्रत्येकाच्या घरी कमीत कमी एक ते दोन दुभती जनावरे असतातच; परंतु ती केवळ कुटुंबापुरतीच असतात.

त्यापेक्षा जास्त पशुपालन करून व्यावसायिक दृष्टीने त्याकडे बघणे अजूनही तेवढे रुजलेले नाही. वर्गीस कुरियन यांनी घडवून आणलेली धवलक्रांती आपण सारे जाणतोच. आजही देशात दूधनिर्मितीत वाढ होण्याची गरज आहे. आपण अजूनही दुधासाठी कोणताही पर्याय उपलब्ध करून देऊ शकलेलो नाही.

वाढती लोकसंख्या पाहता दूध उत्पादन वाढणेही फारच गरजेचे आहे. दूध हे एक पूर्णान्न म्हणून ओळखले जाते. दररोज माणशी 300 मि.लि. दूध लागते. त्याचसोबत आजच्या काळात दुधासोबतच दुग्धजन्य इतर पदार्थांनाही बाजारात खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यवसाय उभा करावयाचा असल्यास सुरुवातीला किमान 5 ते 10 गाई/म्हशी असाव्यात. भारत शासनाने दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी ग्रामीण भागात अनेक योजना राबवल्या आहेत.

त्यापैकीच एक दुग्ध व्यवसाय योजना आहे. यामागील मुख्य उद्देश हा ग्रामीण पातळीवर तरुणांना अधिकाधिक रोजगार मिळावा व त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे असाच आहे. यामध्ये बँका कर्जही उपलब्ध करून देतात.

पशुपालन करताना त्यांच्या संगोपनावर विशेष लक्ष दिले गेले पाहिजे. त्यासाठी योग्य मोकळी व हवेशीर जागा, पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, वीज, पशुखाद्य, पशू वैद्यकीय सेवा, आदी किमान बाबी असणे आवश्यक आहे.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?