स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
ड्रायव्हिंग स्कूल : ‘ऑटो’ क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचा व्यवसाय म्हणता येईल. वाहनांची वाढती मागणी आणि पर्यायाने लोकांची ड्रायव्हिंग शिकण्याची गरज पाहता या क्षेत्राला आजघडीला खूप मागणी आहे. व्यवसायासाठी एक उत्तम पर्याय म्हणून आपण याचा जरुर विचार करू शकतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वत:च्या मालकीची कार असली तर उत्तम. त्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे उत्तम ड्रायव्हिंग कसब.
आवश्यक बीजभांडवल : तुमची स्वत:ची कार व जागा असल्यास कमीत कमी १०,०००/- रुपये बीजभांडवलाची आवश्यकता असते. गृहउद्योग म्हणून या व्यवसायाची घरातून सुरुवात करता येऊ शकते.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox
रिटर्न ऑफ इनव्हेस्टमेंट : व्यवसायात गुंतवलेली गुंतवणूक लवकरात लवकर परत मिळते.
आवश्यक साधनसामग्री : कोणतेही ठरवून ट्रेनिंग घेण्याची आवश्यकता नाही. परंतु चांगलं ड्रायव्हिंग मात्र येणं गरजेचं आहे.
अपेक्षित उत्पन्न : ५ वर्षांत कमीत कमी १० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न कमवू शकतो.
ऑफिससाठी आवश्यक : १० x १० ची एक खोली. स्वत:चा इंटरनेटसह लॅपटॉप, फोन, प्रिंटर, फॅक्स, ऑफिसची स्टेशनरी, व्हिजिटिंग कार्ड लेटरहेड इ. इ.
परवाना आणि परवानगी : तुम्ही घरातून व्यवसाय करणार असाल तर सोसायटीची परवानगी आवश्यक आहे. ड्रायव्हिंग स्कूलसाठी स्थानिक RTO कडून परवानगी लागते.
– टीम स्मार्ट उद्योजक
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.