Advertisement
कथा उद्योजकांच्या

शालेय मुलांमध्ये गणिताची गोडी निर्माण करणारे ‘एंजेल’

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


एंजेल मॅथ्स अकादमी हा अश्विनी आणि संतोष बच्छाव यांचा स्टार्टअप असून ही आज पाच जणांची एक टीम झाली आहे. एंजेल मॅथ्स अकादमी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्याचे मोलाचे काम करते. तसेच शिष्यवृत्ती, एम.टी.एस. परीक्षा, गणिताची ऑलिंपिआड अशा स्पर्धात्मक परीक्षांची तयारीसुद्धा विद्यार्थ्यांकडून करून घेते.

त्यासाठी जे गणित करायला तीन ते चार पायर्‍या लागतात तेच गणित एका पायरीत कसे करायचे आणि तीन-चार मिनिटे सोडवायला लागतील असे गणित दहा ते वीस सेकंदांत कसे सोडवायचे हेसुद्धा विद्यार्थ्यांना शिकवते.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

कल्याणमधील तीन शाळा आणि एंजेलची दोन सेंटर्समध्ये विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया भक्कम करत आहे. मी शाळेत तसा सर्वसाधारण विद्यार्थी होतो. कॉलेजमध्ये बी.एस्सी.च्या पहिल्या वर्षी सहापैकी चार विषयांत नापास झालो. पास केलेले दोन विषय म्हणजे गणित एक आणि गणित दोन. तेव्हा आपल्याला गणित चांगले जमते हे समजले.

गणितातली आवड हळूहळू वाढू लागली.

२००७ साली बी.एस्सी.च्या तिसर्‍या वर्षात संपूर्ण कॉलेजमधून गणितात प्रथम आलो. त्यापुढे २००८-१५ अशी सात वर्षे झायडस कडीला, डॉ. रेड्डी लॅब, सिप्ला अशा भारतीय मल्टिनॅशनल कंपन्यांमधे विक्री, मार्केटिंग आणि मॅनेजमेंट शिकायला मिळाले. या दरम्यान तीन वेळा वेगवेगळे व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला, पण फारसे यश आणि समाधान मिळाले नाही.

तेव्हा मी मार्च २०१५ मध्ये स्वत:चे काऊंसलिंग करून घेतले. काही चाचण्या केल्या. त्यात माझा कल शिकवणी, प्रशिक्षण आणि व्यवसाय याकडे आहे असे समजले. गणित आणि शिकवणी हे समीकरण जुळून आले आणि एंजेल मॅथ्स अकादमी मार्च २०१५ ला सुरू झाली. मग चार महिन्यांत पैशांची जमवाजमव आणि नियोजन करून नोकरीला राजीनामा दिला.

सुरुवातीलाच तीन शाळांमध्ये abacus आणि वैदिक गणितात काम करण्याची संधी मिळाली. काही गोष्टी दिसून आल्या. पहिलीपासून दहावीच्या विद्यार्थ्यांकडून एक ते तीस पाढे पाठ तर करून घेतलेले असतात, परंतु ९५ टक्के मुलांना २१ ते २९ पाढे येत नाहीत. तसेच ८० टक्के विद्यार्थी गणिताच्या पेपरात क्षुल्लक चुका करतात.

आकडेमोड करणे मुलांसाठी कायमच त्रासदायक असते. त्यामुळे गणित हा मुलांचा मानसिक आजार बनतो. त्यामुळे मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होतो. अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी विविध पुस्तके वाचू लागलो. तेव्हा बाल मानसशास्त्राबद्दल कळले.

बाल मानसशास्त्राचा अभ्यास करताना मुलांच्या मनातील भीती घालवण्याच्या थेरपीचा अभ्यास केला. मला दहा-बारा वर्षांपासून प्रेरणादायी पुस्तके वाचायची आवड होतीच. तेव्हा एक कल्पना सुचली. सायकोलॉजिकल थेरपीचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्यासाठी प्रेरित करू शकतो असे वाटले. हाच विचार करून गणिताचा नवीन अभ्यासक्रम तयार केला.

पहिल्याच वर्षी ५५० विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम शिकवून प्रयोग यशस्वीपणे पार पडला. आत्मविश्वास वाढला. शिक्षकापासून उद्योजक झाल्यासारखे वाटले. संस्कृतमधील अंत:प्रेरणा या शब्दावरूनच Entrepreneur हा शब्द आला असावा. हळूहळू काही खेडेगावांत, आश्रमशाळेत, काही शिक्षणसंस्थांमध्ये गेस्ट शिक्षक म्हणून बोलावणी सुरू झाली.

दरवर्षी १ हजार विद्यार्थ्यांना अकादमीमध्ये शिकवायचे आहे. गणिताची प्रयोगशाळा असावी, गणित प्रदर्शन भरवावे असे स्वप्न आहे. सध्या तरी व्यवसायाचे फंडिंग स्वतः उभारलेल्या पैशातून होत आहे. भविष्यात विविध देशांतील पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमांचा अभ्यास करून गणितात ई-लर्निंग सुरू करण्याचा विचार आहे. त्यासाठी एंजेल गुंतवणूकदार किंवा व्हेंचर फंडिंग लागेल.

– संतोष बच्छाव
९३२११७७११४


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!