तणावाचे यशामध्ये परिवर्तन करण्यासाठी ३ नियम

नकारात्मक अस्वस्थतेचे रूपांतर सकारात्मक यशामध्ये करण्यासाठी खालील ३ नियमांचे पालन करा आणि त्यानुसार योग्य कृती करा :

१. बदलता न येत नाही अशा गोष्टी स्वीकारा

आपल्या आयुष्यात एकदा घडून गेलेली गोष्ट अपरिवर्तनीय असते. तू बदलता येत नाही, याउलट तो क्षण इतिहास बनतो. त्यामुळे हुकलेल्या संधींचा विचार करत बसणे आणि होऊन गेलेल्या प्रसंगांबद्दल खंत व्यक्त करत बसणे म्हणजे ऊर्जेचा सर्वात मोठा अपव्यव असतो.

मनात द्वेष साठवणे, बदला घेणे, ईर्षा बाळगणे आणि सूडबुद्धीने विचार करणे यामुळे काहीहीसाध्य होत नाही. यश संपादन करणे हा एकमेव पर्यायच स्वीकारार्ह बदला घेण्याचा आहे.

गोष्टी स्वीकारून पुढे जात राहिल्याने विचलित होण्याऐवजी चालू घडामोडींवर लक्ष द्यायला मोकळे होता. एक समाधानकारक आणि परिपूर्ण आयुष्य जगू लागाल. शिवाय तुमच्या शत्रूंना कायम त्यांच्याशिवाय आणि संशयाच्या सावलीतसुद्धा तुम्ही इतके यशस्वी कसे होत आहात याचे आश्चर्य वाटेल.

कृती : तुम्हाला टोचणाऱ्या भूतकाळात घडून गेलेल्या सर्व घटना एका पेपरवर लिहून काढा. आता तो पेपर चुरगळा आणि कचऱ्यात फेकून द्या. यामुळे त्या घटनांच्या ताणातून मोकळं झाल्यासारखे वाटेल.

२. प्रतिसाद देण्याची पद्धत बदला

इतर लोकांच्या वागण्या-बोलण्याला तुमच्याकडून दिली जाणारी प्रतिक्रिया बदला. यामुळे अपयशाची भीती बाळगण्याऐवजी हवे असलेल्या निकालाच्या विचारांत राहून तुम्ही स्वतःचे विचार आणि कृती नियंत्रित करू शकाल.

आपल्या जीवनातील आपल्या नियंत्रणात असलेल्या एकमेव गोष्टी म्हणजे आपले तात्काळ विचार आणि कृती आणि बरेचदा आपण नकळत प्रतिसाद देत असल्याने भावनिक होऊन कृती न करणे हेच शहाणपणाचे असते. वैयक्तिक नातेसंबंधात भावनिक न होता कृती करायची/प्रतिक्रिया करायची संधी मिळेपर्यंत वाट पाहणे, श्रेयस्कर असते.

कृती : उद्याचा तणावपूर्ण दिवस घालवताना आणि संपल्यावर रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही काय करणार आहेत, हे आजच लिहून काढा.

३. स्वीकार न करता येणाऱ्या गोष्टी टाळा

असह्य किंवा धोकादायक वर्तणूक आणि वातावरणातून बाहेर येण्यासाठी चौकटीबाहेर जाऊन विचार करा.

उदा. एखादी व्यक्ती आपल्यावर धडकणार असं वाटत असेल, तर लेन बदला. हॉटेलात आसपास आवाज करणारे, नकोसे वाटणारे लोक असल्यास तुमचे टेबल किंवा जागा बदला. सतत प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार करणाऱ्या नकारात्मक व्यक्तीपासून स्वतःला लांब ठेवा किंवा लांब जा.

सदैव आपलं आरोग्य, वैयक्तिक सुरक्षा, आर्थिक गुंतवणुक आणि भावनिक नातेसंबंधाला धोकादायक ठरू शकणाऱ्या नकारात्मक परिस्थितींबद्दल सतर्कता बाळगा.

कृती : तुमची किंवा इतरांची स्वीकारता येणार नाही अशी एक सवय, जी तुम्ही उद्यापासून टाळणार आहात, कोणती आहे?

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?