विक्रीमंत्र – १ : आपला ग्राहक ओळखण्याच्या तीन पायऱ्या
उद्योजक मित्रांनो, आशा आहे तुम्हाला तुमचा योग्य ग्राहक आतापर्यंत कळला असेल. याची माहीती मी आपल्यासा पहिल्या भागात दिली होती. (विक्रीमंत्र – १ : आपला ग्राहक ओळखण्याच्या तीन पायऱ्या वाचण्यासाठी) यापुढे तुमचे सगळे मार्केटिंग कम्युनिकेशन हे या ग्राहकाला लक्षात ठेवूनच डिझाईन करावेत. मग ते तुमचं ब्रोशर असो, वेबसाईट असो, मार्केटिंग कॅम्पेन असो किंवा ग्राहकांसाठीची एखादी ऑफर असो.
हे सगळं या ग्राहकांभोवती फिरलं पाहिजे, किंबहुना या सगळ्यांचा मध्यबिंदू हा हाच ग्राहक असला पाहिजे. कोणताही धंदा वाढवण्यासाठी लागतो ग्राहक आणि त्याही अगोदर लागतात ‘लीड्स’. काही उद्योगात मात्र लीड हा विषयच नसतो. डायरेक्ट ग्राहकच येतो यांच्याकडे.
जसे की किराणा स्टोर्स, छोटी हॉटेल्स आणि रिटेल शॉप्स, परंतु इथे मात्र आपण अशा उद्योगांबद्दल बोलत आहोत, ज्यांची बिलींग प्राईज / टिकिट साईज ही एक साईजेबल असते आणि जिथे लिडस ते ग्राहक बनण्यापर्यंत एक प्रोसेस असते.
त्या ठिकाणी याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. किंबहुना तुमच्या प्रॉडक्ट किंवा सेवेची किंमत जेवढी जास्त, तेवढी ही पद्धती जास्त प्रभावापणे काम करते.
पुढची पायरी आहे लीड फिल्टरेशन प्रोसेस. यात तुम्ही जनरेट केलेल्या लीड्स फिल्टर करण्याचं काम आपल्याला इथे करायचं आहे. म्हणजे काय तर तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक लीडवर एका ठरावीक पॅरामिटरव काम करणे व त्यात पास झालेल्या लीड्सवर पुढे त्याच्या स्ट्रेन्थनुसार प्रत्यक्षपणे काम करणे.
यासाठी आपाल्याला एक लिडस फिल्टरेशन फॉम बनवता आला तर उत्तमच. त्यात साधारणपणे खालील गोष्टींचा समावेश असावा. (ज्या माहितीच्या आधारे तुम्हाला त्या लीड्समध्ये खरच दम आहे का? हे कळू शकेल) जसे की :
नाव :
घरचा पत्ता :
प्रोफेशन किंवा कंपनीच नाव :
(नोकरी करत असल्यास) पद : (यातून तुम्हाला त्यांची पेईंग कपॅसिटी कळेल)
सध्या काही लोन आहे का? :
फोन नंबर :
घरात इतर कोणी कमावती व्यक्ती आहे का? : (यातूनही तुम्हाला त्यांची पेईंग कपॅसिटी कळेल)
आमच्याकडून काय अपेक्षा आहेत? : (तुम्हाला त्यांना नेमक काय सांगायचय ते कळेल)
आमच्यापर्यंत कसे पोहचलात? : (मार्केटिंग स्ट्रटेजीसाठी याचा तुम्हाला पुढे उपयोग होईल.) जसे की मित्र, वृत्तपत्र, सोशल मीडिया, इतर माध्यम (जी तुम्ही मार्केटिंगसाठी वापरतात तीचा उल्लेख इथे येऊ द्या.)
(शक्य असल्यास) अपेक्षित बजेट :
आवडता छंद :
कोणत्या वेळेत तुम्हाला फोन केलेला आवडेल? :
वरील लीड फिल्टरेशन फॉममध्ये तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीनुसार आणि तुमच्या आवश्यकतेनुसार योग्य ते बदल करू शकता. आपला मुख्य उद्देश आहे. योग्य लिडसवर सिस्टमॅटीत पद्धतीने काम करणे व त्यातून आपला सेल्स क्लोजिंग रेशो वाढवणे.
– विश्वास वाडे
विक्रीमंत्र – ३ : सेल्स प्रोसेसचे तीन टप्पे
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.