अपयशाला न भीता स्वतःला घडवणारा उद्योजक


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


कुमार वयात प्रत्येक गोष्टीची जिज्ञासा होती. ती करून बघण्याची वृत्ती स्वस्थ बसू देत नसे. त्यामुळे पंधरा प्रकारचे उद्योग करून पाहिले. यश कशातच सापडले नाही; पण अनुभवाने समृद्ध झालो. याशिवाय त्यांचे मोठे काका रमेशलाल भंडारी त्यांच्यासाठी प्रेरणास्थानी आहेत.

त्यांच्या प्रेरणेने आज ‘हिंदुस्थान ट्रेडिंग कंपनी’ या नावाने होम क्लिनिक उत्पादने आणि फूड म्यॅनुफॅक्चरिंगमध्ये उतरून लाखोंची उलाढाल आहे. याच्या संस्थापकाचे नाव आहे विजय झुंबरलाल भंडारी.

अहमदनगरचे विजय यांचे शिक्षण बारावी नापास; पण याचा न्यूनगंड मनात कधी आला नाही. पुढे मुक्त विद्यापीठातून शिक्षण सुरू ठेवले. जिज्ञासू वृत्तीमुळे संधी शोधत राहिले.

२०१८ साली होम क्लिनिक उत्पादने सुरू करायचे पक्के झाले. ही उत्पादने ही प्रत्येक घराची रोजची गरज असल्याने त्याला मरण नाही. उलट याची मागणी वाढतच जाणार हे नक्की. सुरुवातीला घरच्यांचा विरोध झाला. पुरेसे भांडवल आणि माहिती नव्हती. सुरुवातीला वेगवेगळ्या रसायनांमध्ये काम करताना केमिकलचा हातापायांसोबत संपर्क यायचा.

यातून हातपाय भाजायचे; पण तरी उत्पादन जास्तीत जास्त चांगले करण्यासाठी प्रयोग करत राहिले. हॅण्डग्लोव्हज्, बूट वापरून योग्य पद्धतीत सावधानीने काम करायला हवे याची जाणीव काम करताना कळली. सुरुवातीला मशीन घ्यायला पैसे नव्हते. एका मित्राने त्या वेळी मला जुगाड करून एक मशीन तयार करून दिले आणि काम सुरू झाले.

यातूनच हारप्लस टॉयलेट क्‍लीनर, फ्लोअर क्‍लीनर, डिश वॉश क्लिनर, हॅन्डवॉश क्लीनर, मॉस्किटो रिप्लांट अशी उत्पादने बाजारात उतरवली. आपल्या उत्पादनाचा ब्रँड म्हणून बाजारात उतरवताना त्यांना खर्‍या अर्थाने संघर्ष करावा लागला तो म्हणजे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन वेळी.

ज्या कंपनीने ट्रेडमार्क नोंदणी करून देण्याचे काम घेतले होते त्यांच्याकडून योग्य प्रकारे माहिती मिळाली नाही आणि मग प्रोसेस सुरू झाल्यावर अनेक कायदेशीर बाबी समोर येऊ लागल्या त्यासाठी खर्च वाढू लागला आणि या सगळ्यात डोक्यावर कर्ज वाढले.

खूप नैराश्य आले. एक क्षण असा आला की, आता आत्महत्या करावी, अशीही मनात भावना आली; पण त्यानंतर पुढच्याच क्षणी मनाची दुसरी बाजू समोर आली. तुला तुझा प्रवास इथपर्यंतच करायचाय होता का? एवढ्यात हार मानली? असे मन स्वतःलाच प्रश्न करू लागले. स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचंय तर स्वतःला तुलाच मार्ग शोधायला लागेल, आणि तो विचार झटकून कामाला लागलो, असे विजय सांगतात.

आपत्तीत जो टिकतो आणि त्यातल्या संधीचं व्यवसायवाढीसाठी सोनं करतो तो उद्योजक भविष्यात नक्कीच यशस्वी ठरतो. आज लॉकडाऊन काळात हॅन्डवॉश, फ्लोअर क्लीनिंग या उत्पादनांना मागणी वाढली. अनेक ठिकाणी माल अडकला.

कच्चा माल मिळायला अडचणी आल्या पण तरी आपल्या सहकार्‍यांसोबत गुणवत्तेत कुठलीही तडजोड न करता दैनंदिन उत्पादनवाढीवर भर दिला. गुणवत्तेसोबतच ग्राहकांचा विश्वास जपल्यामुळे उद्योगवाढीसाठी याचा फायदा झाला.

विजय यांना भविष्यात एक मल्टीनॅशनल कंपनी उभी करायची आहे. त्याचा हा पाया आहे. आज चार कामगार त्यांच्यासोबत काम करतात आणि चार जिल्ह्यात मालाचे वितरण होते. भविष्यात तीन हजार हातांना काम देण्याचे स्वप्न विजय यांचे आहे. टप्प्याटप्प्याने हिंदुस्थान ट्रेडिंग कंपनीची घोडदौड चालू आहे. ही वाट लवकरच महामार्ग होणार याचा त्यांना विश्वास आहे.

संपर्क : विजय भंडारी – ८३२९३०३०५२

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top