दूध व्यापारी ते आइस्क्रीम कंपनी मालक प्रवास गायतोंडेंचा

१९८९ ला व्यवसायाची सुरुवात केली. वडिलांची दुधाची फॅक्टरी होती. तिचे आम्ही आइस्क्रीममध्ये रूपांतरित केले. गुजरातहून आम्ही अमूलचे दूध मागवायचो आणि इथे घाऊक व्यापार्‍यांना विकायचो. १९८९ ते १९९४ च्या दरम्यान आम्ही ‘क्‍वालिटी फूड्स’ला बासुंदी बनवून द्यायचो. १९९४ मध्ये ‘क्‍वालिटी वॉल्स’ने या कंपनीला विकत घेतले. आमच्याकडे त्या वेळी हे एकच बासुंदीचे गिर्‍हाईक होते. त्यानंतर मग मी या क्षेत्रात जोमाने उडी घेतली.

आमची पार्श्‍वभूमी ही उद्योगाचीच आहे. वडिलांनी १९७० मध्ये दुधाचा व्यवसाय सुरू केला होता. १९६० साली आमचे सुरती हॉटेल्स ‘वसंत’ म्हणून होते. पाचधुणी आणि भुलेश्‍वरला एकूणच आमची अगोदर हॉटेल इंडस्ट्री होती. १९७५ च्या दरम्यान वडिलांनी आइस्क्रीम फॅक्टरी सुरू केली होती; परंतु आणीबाणीच्या काळात ती फॅक्टरी बंद करावी लागली. मग पुन्हा सुट्या दुधाच्या व्यवसायाकडे वळलो. मी मात्र १९९४ पासून पूर्णत: कुल्फी आणि आइस्क्रीममध्येच आहे.

बासुंदी आणि आइस्क्रीम या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. एकाच प्रकारात मोडतात. बासुंदीपासून कुल्फी तयार होते. अगोदर कुल्फी चालू केली. सुरुवातीला सात ते आठ वर्षे आमच्याकडे कुल्फीच होती. समान प्रॉडक्ट असल्यामुळे गिर्‍हाईके तीच आहेत.

‘अमूल’ किंवा ‘क्‍वालिटी वॉल्स’शी तुलना करता ‘फेस्टिव्हल’ आइस्क्रीम हे तर ९५ टक्के त्यांच्या तोडीस उतरते. पाच-एक टक्क्यांचा जो फरक आहे, तो यंत्रसामुग्रीचा आहे. त्यांची यंत्रे अद्ययावत आहेत. प्रॉडक्ट आणि साहित्याबाबत आम्ही खूप चांगला रिझल्ट देतोय.

‘फेस्टिव्हल’ आइस्क्रीमचे सध्या मुंबई, उपनगर, गुजरातमध्ये बोर्डीपर्यंत, मध्य मुंबईत बदलापूर, वांगणी आणि खोपोलीपर्यंत वितरण होते. सध्या पुणे, चिपळूण आणि सातारा इथे वितरक यांची नेमणूक झाली आहे आणि वितरणाला सुरुवात झाली आहे.

मुंबईच्या एकूण आइस्क्रीम विक्रीमध्ये आमचा सुमारे दोन टक्के वाटा असेल. क्रमांक एकवर ‘अमूल’, त्या खालोखाल ‘क्‍वालिटी वॉल्स’, ‘हॅवमोअर’ आणि मग इतर सर्व.

आमच्याकडे उपलब्ध फायनान्सनुसार आम्ही डीप फ्रीजर्स वाढवतोय आणि विक्रीची टीम वाढवतोय. दुकानदारांना आम्हाला डीप फ्रीजर्स द्यावे लागतात, तिथे फायनान्स हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि जिथे इतर मशीनरी आहेत तिथे आमचा माल ठेवला जातो. लग्‍नसराईत आमची बासुंदी जाते, परंतु तीही आम्ही सामान्य विक्रीत उतरवायच्या प्रयत्नात आहोत. रिटेल पॅकिंगमध्ये आणण्याचा विचार आहे. त्यावर अभ्यास चालू आहे.

एकामागोमाग एक राज्यात विस्तार करण्याचे प्लॅनिंग आहे. प्रथम संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान असे. या व्यवसायात लॉजिस्टिक हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो. सध्या गिर्‍हाईक कोलकाता आणि नवी दिल्‍लीतही आहेत. मुंबई आणि परिसरात आमचे पंधरा वितरक आहेत. तिथून मग दुकानदारांकडे माल जातो. ही चेन सिस्टम आहे. असं अजून इतर राज्यांत नाही. ते आता हळूहळू प्रस्थापित करण्याची आमची योजना आहे. यात दोन पद्धती असतात. आपण इतर राज्यात कारखाना टाकू शकतो.

कुल्फी हे आमचं मुख्य प्रॉडक्ट आहे. त्याचे पार्लर्स उभारण्याची मनीषा आहे. चांगली हायजिनीक कुल्फीचे पार्लर्स उपलब्ध नाहीत. शुद्ध दुधापासून बनवलेली कुल्फी तिथे उपलब्ध केली जाईल. भविष्यात ‘डायल ऑन आइस्क्रीम’ या संकल्पनेवरसुद्धा आमचे काम सुरू आहे. संपूर्ण मुंबईमध्ये एका फोन कॉलद्वारे आइस्क्रीम घरपोच पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. यातून अनेकांना रोजगारही निर्माण होतील.

– विजय गायतोंडे
९८२०१२९७०३


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

  • शैलेश राजपूत

    शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

    व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?