अपंगत्वावर मात करून देशभर विस्तारत आहे आपला व्यवसाय

नोकरी म्हणजे बंधन, जे आपण स्वत:च स्वत:भोवती निर्माण करतो. पिंजर्‍यात अडकलेल्या पोपटासारखे. मला मात्र असे जगायचे नव्हते. मला या अवकाशात उत्तुंग भरारी घ्यायची होती म्हणून मी उद्योजक व्हायचे ठरवले, असे हरीष पुरकर स्वत:बद्दल बोलतात.

मुळचे नाशिकचे असलेले हरीष पुरकर यांना बालवयातच अपंगत्व आले. ८६ टक्के शारीरिक अस्थिव्यंग असूनही त्यांनी कॉम्प्युटर इंजिनीयरिंग डिप्लोमापर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर डिझायनिंगचा कोर्स करत असताना खासगी कंपनीत नोकरीदेखील केली. त्यातून त्यांना अनुभव मिळाला. तसेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षे कंपनीत नोकरीचा अनुभव घेतला.

स्वत: काही तरी नावीन्यपूर्ण घडवावे म्हणून स्वत:चा व्यवसाय करण्याचे ठरवले. नोकरी करताना मिळालेला पैसा व उचललेले कर्ज यावर आधारित जागा घेऊन ऑफिस उभारले. स्वत: वेबसाइट तयार करून व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचवला.

फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर पूर्ण भारतात त्यांचा व्यवसाय पसरला आहे आणि नक्कीच इंटरनेटमार्फत तो जगातील कानाकोपर्‍यात पोहोचवणार असे त्यांचे ब्रीद आहे. DzineLemon चे संपूर्ण काम तंत्रज्ञानावर आधारलेले असून सध्या त्यांच्या कंपनीत चार जण नोकरी करतात. शारीरिक अपंगत्वाने खचून न जाता खंबीरपणे प्रत्येक आव्हानाला हरीश पूरकर यांनी दिले आहे. आपले काम हेच आपले ध्येय आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

संपर्क : हरीष पुरकर
९७६५८३७४८२


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?