उद्योगसंधी

शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवसांत करता येतील असे १० व्यवसाय

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


उद्योग, व्यवसायाची सुरुवात कुठून तरी करायची, पण नोकरी सोडून ते करण्याचं धाडस एका दिवसात आणता येत नाही. मग याची सुरुवात थोडी थोडी करावी लागते. हळूहळू व्यवसायाचा अनुभव येऊ लागतो. खाचखळगेही कळू लागतात. त्यातूनच आपणही उद्योजक होऊ शकतो, हा आत्मविश्वास निर्माण होतो.

अशा स्थितीत असलेल्या अनेकांसाठी हा लेख आहे. या लेखात असे अनेक व्यवसाय आहेत, जे तुम्ही फक्त शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवसात करू शकता अशांची ओळख करून दिली आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

१. साइड बिझनेस सुरू करा :

नोकरीसोबत एखादा छोटा-मोठा व्यवसाय सुरू करू शकाल का, याचा विचार सुरू करा. उदाहरणार्थ एखादे दुकान सुरू करून त्यात गरजेनुसार माणसं कामाला ठेवू शकता. तुम्ही नोकरीनंतरच्या वेळेत किंवा सुट्टीच्या दिवसांत दुकानात लक्ष घालू शकता. दुकानाप्रमाणे असे हजारो-लाखो व्यवसाय निघतील जे तुम्ही साइड बिझनेस म्हणून करू शकता.

२. दुसऱ्याच्या व्यवसायात भागीदार व्हा :

अनेक तरुण उद्योजकांना व्यवसाय सुरू करायचा असतो, पण भांडवलाची अडचण असते. अशा व्यवसायात गुंतवणूक करून तुम्ही भागीदार होऊ शकता. व्यवसाय मुख्यत्वे तुमचा नसल्यामुळे त्याच्या रोजच्या घडामोडीत तुम्हाला लक्ष देण्याची आवश्यकता नसेल. तुमच्या आवडीनुसार किंवा उपलब्ध वेळेनुसार तुम्ही व्यवसायात लक्ष घालू शकता. ज्याने तुम्ही गुंतवलेल्या पैशाचा योग्य विनियोग होऊन व्यवसाय वाढतो आहे की नाही हे तुम्ही पाहू शकता.

३. ब्लॉगर व्हा!

वर्डप्रेस किंवा ब्लॉगरवर एक ब्लॉग सुरू करा. ब्लॉग सुरू कसा करायचा हे शिकवणारे हजारो व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहेत. त्यातला कोणताही व्हिडिओ बघा आणि कामाला लागा. ब्लॉग तयार केला की त्यावर सुट्टीच्या दिवशी किंवा फावल्या वेळात चांगल्या चांगल्या विषयांवर माहिती शोधून लेख लिहा. झाली तुमच्या व्यवसायाला सुरुवात.

ब्लॉग तयार करणे तसेच त्यासाठी लागणारे hosting इत्यादी संपूर्णपणे मोफत आहे. तुम्ही स्वतःचा डोमेन व hosting घेऊन करणार असाल, तर त्यासाठी वर्षाला ₹४,००० ते ₹५,००० खर्च येऊ शकतो.

नुसते लेख लिहून पैसे कसे कमावणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुम्ही लेख लिहायला सुरुवात केली आणि त्यावर लोक भेट देऊ लागली की तुम्ही ‘गुगल’कडून जाहिराती घेऊ शकता. त्यासाठी ‘गुगल adsence’वर रजिस्टर करावं लागेल. तेही मोफत आहे.

ब्लॉग सुरू केला की सोबत affiliate marketing सुद्धा सुरू करा. ‘अमेझॉन’सह अनेक e-commerce portal वर affiliate होण्याची सोय उपलब्ध असते. त्यांचे affiliate होऊन त्यांची प्रॉडक्ट्स तुम्ही तुमच्या ब्लॉगवर विकायला, दाखवायला सुरुवात करू शकता. या प्रॉडक्ट्सबद्दल लोकांना माहिती देणारे लेखही लिहू शकता. लोक तुमच्या affiliate लिंकवर जाऊन थेट ‘अमेझॉन’वरून खरेदी करतील आणि ‘अमेझॉन’ त्यातून तुम्हाला कमीशन देईल.

एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी (Print)

४. लेख लिहा आणि पैसे कमवा :

तुम्हाला जर लेखनाची आवड आहे आणि लेख लिहून तुम्ही पैसेही कमवू इच्छित असाल तर ‘स्मार्ट उद्योजक’ने तुमच्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहेत. यासाठी तुम्हाला प्रथम ‘स्मार्ट उद्योजक’च्या Affiliate Marketing साठी रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर पुढे दोन पर्याय उपलब्ध होतात.

‘लोकोपयोगी’ हे स्मार्ट उद्योजक ग्रुपमधील नवे वेब पोर्टल आहे. यावर विविध समाजोपयोगी विषयांवर लेख प्रसिद्ध होणार आहेत. तुम्ही लेख लिहा व आमच्याकडे पाठवा. तुमचे लेख आम्ही ‘लोकोपयोगी’वर प्रसिद्ध करू.

यामध्ये तुम्हाला तांत्रिक ज्ञान असण्याचे गरज नाही. तुम्ही लेख लिहून आम्हाला व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे पाठवू शकता. आम्ही त्या लेखावर आवश्यक ते संपादकीय संस्कार करून त्यात तुमचा affiliate banner insert करून तो लेख प्रसिद्ध करू.

आमच्यामार्फत तुमच्या लेखाचे डिजिटल मार्केटिंगही केले जाणार असल्याने तुमच्या लेखाला मोठ्या प्रमाणात वाचक मिळू शकतील. यातून तुमच्या affiliate products ची विक्री वाढेल आणि त्यातून चांगले कमीशनही मिळवाल.

एकदा काम करा आणि दीर्घकाळ पैसे कमवा

तुमचे ‘लोकोपयोगी’वरील एखादा लेख लिहिण्यासाठी एकदाच कष्ट घ्यायचे आहेत, परंतु तुमचे लेख हे तिथे कायमस्वरूपी राहणार आहेत व त्यात affiliate banner ही कायम राहणार. त्यामुळे गुगल सर्च किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक कधीही त्याला भेट देतील व त्यातून तुम्हाला अर्थार्जन होत राहील.

‘स्मार्ट उद्योजक’ Affiliate Marketing मध्ये जोडले जाण्यासाठी येथे क्लिक करा.

५. युट्युब चॅनल चालवा

‘युट्युब’ला खूप मोठ्या प्रमाणात कंटेंटची गरज आहे. लॉकडाउन काळापासून ही गरज खूपच वाढली आहे. कोणीही सामान्य माणूस कोणत्याही गुंतवणुकीशिवाय फक्त हातात फोन घेऊन युट्युबर होऊ शकतो.

‘युट्युब’ चॅनल कसे सुरू करायचे? त्यावर व्हिडिओ कसे अपलोड करायचे आणि त्यातून अर्थार्जन कसे करायचे याची सविस्तर माहिती तुम्हाला ‘युट्युब’वरच उपलब्ध आहे आणि तीही पूर्णपणे मोफत.

तुम्ही कुठेलेही राहणारे असाल, कोणत्याही आर्थिक स्तरातील असाल, तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी काहीही असेल तरीही तुम्ही ‘युट्युब’ येऊ शकता, पॉप्युलर होऊ शकता आणि पैसेही कमवू शकता. शनिवार-रविवार किंवा सुट्टीचे दिवस धरून तीन ते चार व्हिडिओ तयार केले तरी तुमचे आठवड्याचे काम पूर्ण झाले.

६. विमा सल्लागार :

IRDA ची परीक्षा उत्तीर्ण होऊन तुम्ही कोणत्याची विमा कंपनीचे विमा विक्रेते होऊन जीवन विमा किंवा जनरल विमा विकू शकता. शहरी भागात बारावी आणि ग्रामीण भागात दहावी उत्तीर्ण कोणताही विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. साधारण दीड ते दोन हजार रुपये परीक्षेचा खर्च असतो. ही एवढीच या व्यवसायाला लागणारी गुंतवणूक.

तुम्ही सुट्टीच्या दिवशी किंवा फावल्या वेळात व्यवसाय शोधता आहात, त्याच वेळी इतरांनाही सुट्टी असणार. तुम्ही त्यांना गाठू शकता. विम्याबद्दल माहिती देऊ शकता आणि विमा विकू शकता.

७. टुर ऑपरेटर :

शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी छोट्या छोट्या सहली आयोजित करू शकता. ट्रेक आयोजित करू शकता. लोकांना रोजच्या धावपळीतून ब्रेक हवा असतो. हीच तुमच्यासाठी पैसा कमावण्याची संधी आहे. कल्पकतेने मस्त ठिकाणं किंवा काही थिम ठरवून छान सहली काढू शकता. लोकांना एकदा तुमच्या सहलींची सवय लागली की हाच तुमचा बारमाही व्यवसाय होऊ शकतो.

८. प्रशिक्षण द्या :

तुमच्यात जी कौशल्य (स्किल्स) आहेत, ती तुम्ही दुसऱ्यांना शिकवू शकता. तुम्ही काही म्हणजे अगदी काहीही शिकवू शकता. लोक शिकायला तयार आहेत. फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा अभ्यासक्रम तयार करता आला पाहिजे आणि टप्प्याटप्प्याने शिकवता आले पाहिजे.

याचे तुम्ही प्रत्यक्ष वर्ग घेऊ शकता किंवा झूम, गुगल मीट अशा ॲप्सचा उपयोग करून लोकांना ऑनलाइन ही शिकवू शकता.

अनेक प्रशिक्षक सुरुवातीला फ्री सेमिनार किंवा वेबिनार घेऊन लोकांना यामध्ये जोडतात. तुम्ही जे शिकवणार आहात, त्या क्षेत्रातले तुमचे ज्ञान, तुमची शिकवण्याची पद्धत आणि कोर्स कंटेंट या तीन गोष्टी लोकांना आवडला तर लोक paid कोर्सलासुद्धा नक्की प्रवेश घेतात.

जर तुमच्या लोकांना शिकवता येईल अशी काही कौशल्ये नसतील, तर इंटरनेटवर लोक सध्या काय काय शिकतात, नवीन काय आहे अशा गोष्टींचा शोध घ्या. स्वतः ते शिका. त्याचा सराव करा आणि त्या विषयात प्रावीण्य मिळवा आणि लोकांना शिकवायला सुरुवात करा. उदाहरणार्थ सध्या artificial intelligence हा विषय नवीन आहे. लोकांना याबद्दल उत्सुकता आहे. असे विषय अभ्यासून तुम्ही लोकांना प्रशिक्षित करू शकता.

९. ‘स्मार्ट उद्योजक’ प्रतिनिधी व्हा!

‘स्मार्ट उद्योजक’ उद्योगविषयक मासिक आहे. या मासिकाचा प्रसार करणे हे तुमचे काम राहील. लोकांना मासिकाची ओळख करून देणे व त्यांना वर्गणीदार करणे एवढेच तुमचे काम राहील. यात तुम्हाला आकर्षक कमीशन मिळेल. हे काम तुम्ही ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष फिरूनही करू शकता. वर्गणीदार जोडण्यासोबत पुस्तक विक्री तसेच जाहिरातीही विकू शकता. दररोज थोडा वेळ देऊन हे काम केले तर महिना ₹३,००० ते ₹५,००० सहज कमवू शकता.

स्मार्ट उद्योजक प्रतिनिधी होण्यासाठी येथे क्लिक करा.

१०. अकाउंटिंग आणि जीएसटी फायलींग

प्रत्येक उद्योजकाला अकाउंटिंग आणि जीएसटी फायलिंग करून देणाऱ्याची गरज आहे. जर तुम्हाला अकाउंटिंग येत असेल तर तुम्ही ही सेवा देऊ शकता. आठवड्याची बिले घेऊन शनिवार-रविवारमध्ये तुम्ही अशा उद्योजकांचे अकाउंट्स सांभाळू शकता.

जीएसटी फायलिंग हे काम महिन्यातून एकदाच करावे लागते. नियमित व्यवस्थित अकाउंटिंग केलेले असेल तर जीएसटी फायलिंग करण्यात काहीही अडचण येत नाही तसेच वेळही जात नाही.

जीएसटी फायलिंग करण्याविषयी संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला जीएसटी इंडिया या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अकाउंटिंग करण्यासाठी तुम्ही टॅली किंवा अन्य अनेक सॉफ्टवेअर किंवा ॲप्स वापरू शकता.

अनेक अकाउंटिंग सॉफ्टवेअर हल्ली मोबाइल ॲप आणि डेस्कटॉप सॉफ्टवेअर अशा दोन्हींवर काम करण्याची सोय देतात. याचा डेटा क्लाउडवर असतो आणि तुम्ही तो केव्हाही आणि कुठूनही access करू शकता. व्यापार, झोहो बुक्स ही अशा काही सॉफ्टवेअरची उदाहरणे आहेत.

– शैलेश राजपूत


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!