Advertisement
कथा उद्योजकांच्या

पतंजली, आयुर्वेद, बाबा रामदेव आणि स्वदेशी

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

पतंजली आयुर्वेद ही हरिद्वार येथील ग्राहक संकुल माल (consumer packaged goods) असलेली कंपनी आहे, ही कंपनी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी २००६ मध्ये सुरू केली होती. बाळकृष्ण (बाळकृष्ण सुवेदी) भारतीय अब्जाधीश उद्योजक आणि ग्राहक वस्तू कंपनी पतंजली आयुर्वेदचे अध्यक्ष आहेत. बाबा रामदेव पतंजली आयुर्वेदचे संस्थापक आहेत.

पतंजली आयुर्वेद कंपनी खाण्याच्या वस्तूंची, औषधे आणि हर्बल उत्पादने बनवते. सीएलएसए आणि एचएसबीसीच्या मते पतंजली ही भारतातील सर्वात वेगवान वाढणारी एफएमसीजी कंपनी आहे. २०१८ पर्यंत भारताच्या सर्वाधिक विश्वासार्ह ब्रॅण्ड (द ब्रॅण्ड ट्रस्ट रिपोर्ट) च्या यादीमध्ये ते तेराव्या क्रमांकावर आहे आणि एफएमसीजी प्रकारात प्रथम क्रमांकावर आहे.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

आंतरराष्ट्रीय योग दिन आणि योगातून बिझनेस या गोष्टींचे औचित्य साधून मी, बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेद कंपनी यावर व्यंगचित्र काढले आहे –

आत्ता जरा पतंजलीच्या यशाची रहस्ये बघुयात :

१. उत्पादनाची गुणवत्ता – आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उत्पादने

२. नि: शुल्क जाहिरात (बाबा रामदेव देशभरात आणि टीव्हीवर योग शिबिरे घेताना याचा प्रचार करत होते)

३. पतंजली ‘ब्रँडेड हाऊस’ धोरण आखते, तर P&G आणि HUL सारख्या ग्राहक वस्तू क्षेत्रातील इतर कंपन्या ‘हाऊस ऑफ ब्रँड्स’च्या रणनीतीचा अवलंब करतात. याला सिंगल-ब्रँड स्ट्रॅटेजी असेही म्हणतात. HUL आणि P&G यासारख्या बर्‍याच ब्रँड लॉन्च करण्याऐवजी हे सर्व काही एकाच नावाने विकतात.

४. ब्रँड अ‍ॅम्बेसेडर (बाबा रामदेव)

५. स्वस्त उत्पादने. पतंजलीच्या बर्‍याच उत्पादनांची किंमत स्पर्धेपेक्षा कमी असते. पतंजली आटा आयटीसी आणि पिल्सबरीपेक्षा स्वस्त आहे.

६. तोंडी जाहिरात करणे – जाहिरात करण्याची सर्वोत्तम पद्धत.

७. शक्तिशाली वितरण नेटवर्क

८. उत्पादनांची प्रचंड विविधता

पतंजली आणि बाबा रामदेव विचारधारा :

१. स्वदेशी : भारतीय कंपन्यांनी बनवलेली उत्पादने खरेदी करावीत.

२. दानार्थ संपन्नता : त्याचा नफा कुणाच्याही खिशात जात नसल्याचा पतंजलीचा दावा आहे.

३. राष्ट्र निर्माण आणि गरिबांना मदत करणे

ह्यातूनच शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे, पतंजली इतकी यशस्वी झाली आहे की बाबा रामदेव ज्यावर विश्वास ठेवतात त्यावर लाखो लोक विश्वास ठेवतात. बाबा रामदेव अनेकदा हुतात्मा राम प्रसाद बिस्मिल यांची कविता गात असतात –

मेरा हो मन स्वदेशी, मेरा हो तन स्वदेशी।
मर जाऊं तो भी मेरा, होवे कफ़न स्वदेशी।।

– जयेश फडणीस
8097130476


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!