उद्योगसंधी

लग्नाच्या निमित्ताने निर्माण होणारे व्यवसाय

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


आपल्या भारतीयात लग्नसंस्काराला खूप महत्त्व आहे आणि आता लग्न हा एक खूप मोठा सोहळा असतो. त्यामुळे अनेक प्रकारच्या व्यवसायसंधी या लग्नसंस्काराच्या कार्यक्रमात दडलेल्या असतात. चला तर मग आज आपण लग्न आणि त्यामध्ये दडलेल्या उद्योगसंधी पाहूया.

१. हॉल : लग्नसमारंभासाठी आपण मित्रपरिवार आप्तेष्ट नातेवाईक अशा आपल्या सर्व सोयर्‍यांना आमंत्रित करतो. आपला आनंदात सहभागी करून घेतो. त्यामुळे लग्नाला उपस्थितांचा आकडा हा शेकडो किंवा हजारो मध्ये असतो. अशावेळी घर ही जागा लहान पडते. मग शोध सुरू होतो हॉलचा किंवा मोठ्या मोकळ्या जागेचा ज्या ठिकाणी मंडप घालून लग्नसमारंभ साजरा केला जातो. त्यामुळे ही एक मोठी संधी आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

आज घडीला अशी भाड्याने एका दिवसापुरती जागा उपलब्ध करून देताना जागेनुसार ५० हजार रुपयांपासून ते अगदी लाखांमध्ये आपण भाडे आकारू शकतो. मोक्याची जागा, पाण्याची सोय, आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी असते.

नोव्हेंबर ते मेपर्यंत लग्नसराईचे मुहूर्त असल्यामुळे लग्नासाठी याची जास्त मागणी असते, परंतु आपल्याकडे विविध प्रकारचे कार्यक्रम नेहमीच साजरे केले जातात त्यामुळे हॉलला बारसे, वाढदिवस, साखरपुडा, ओठभरण, याशिवाय इतरही अनेक प्रकारचे कार्यक्रम केले जातात. म्हणूनच बारमाही चालणारा हा एक उद्योगसंधी असलेला पर्याय आहे.

२. डेकोरेशन : हॉल म्हटले की डेकोरेशन आलेच. आता प्रकारच्या थीम ठरवून लोक डेकोरेशन करून घेतात. कार्यक्रम आणि त्याचे औचित्य समजून विविध प्रकारचे डेकोरेशन आपल्याला आपल्या ग्राहकाला देता आले पाहिजे. त्यासाठी विविध संकल्पना राबवता आल्या पाहिजेत.

लग्न, मुंज, बारसे, वाढदिवस, साखरपुडा अशा समारंभानुसार डेकोरेशन बदलते असते याची आपल्याला माहिती असावी आणि वेगळ्या विचारांची गती असावी लागते. प्रत्येकाला पैसे खर्च करताना काहीतरी वेगळं, हटके असे हवे असते.

डेकोरेशन आर्टिफिशियल किंवा लाईव्ह ओरिजनल फुलांचे किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून करता आले पाहिजे ही या व्यवसायाची गरज असते. यातही खूप मोठी उद्योगसंधी आहे. जसे हॉल ला केले जाते तसेच ते घर ऑफिस किंवा इतर अनेक ठिकाणी सजावटीसाठी म्हणून केले जाते. यामुळे हासुद्धा एक सीझनल उद्योगसंधीचा पर्याय आहे.

३. मेहंदी : मेहंदी हा प्रत्येक स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय. आपल्याकडे स्त्रियांना मेहंदी काढून घेणे खूप आवडते. आता तर हातासोबतच पायांवरही मेहंदीकाम केले जाते. तसाही हा बारमाही चालणारा व्यवसाय आहे, पण लग्नसराईत हा तेजीत असणारा व्यवसाय आहे.

नाजूक कोरीव आणि भरगच्च मेहंदी काढणे ही एक कला आहे आणि काही लोकांनाच ती अवगत असते. अशावेळी आपल्यातील या कलेला आपण व्यवसायात रूपांतरित करू शकतो आणि पैसे कमवू शकतो. कॉलेजमध्ये शिकणार्‍या मुली, ज्यांना याची आवड आहे तो शिक्षणासोबतच पैसेही कमवू शकतात.

व्यावसायिक मेहंदी डिजाइनर हजारांमध्ये याचे मानधन आकारतात. नवरीच्या हातावरची मेहंदी ही फारच खास असते आपल्याकडे त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. म्हणूनच या उद्योगसंधीचा आपण विचार करू शकतो.

४. केटरिंग : ही एक मोठी उद्योगसंधी आहे. भारतात हजारो प्रकारचे खाद्यपदार्थ बनतात. भारतीय हा पक्का खवय्या आहे. जागतिकीकरणामुळे जगाच्या कानाकोपर्‍यात तो पोहोचला आहे. कुठेही असले तरीही आपापल्या प्रांतातले आपले पदार्थ हे प्रत्येकासाठीच खूप आवडीचे असतात.

त्यासोबतच आपण इतर चवीचे इतर प्रांतातले पदार्थसुद्धा आपलेसे करतो. आपल्या देशात आता मोठ्या शहरांमध्ये कॉस्मोपॉलिटीन वस्ती असते. यामुळे विविध प्रांतातले पदार्थ आपल्याकडे आपल्या घरचेच झालेल्या असतात. लग्नसमारंभात आपल्या पदार्थांसोबत इतरही अनेक पदार्थ आपण ठेवतो.

‘अतिथी देवो भव’, म्हणत आपण आलेल्या पाहुण्याला पोटभर खाऊ घालतो ही आपली संस्कृती आहे. म्हणूनच सणसमारंभात आपण पाहुण्यांना आमंत्रित करतो आणि जेवू घालतो. लोक जास्त असले की आपल्याला केटररची मदत ही घ्यावीच लागते. त्यामुळे केटरिंग या व्यवसायाला खूप मागणी आहे.

वैविध्य, चांगली चव, पौष्टिक आहार आणि विविध पदार्थ यासाठी आपल्याला केटरिंग व्यवसायात विशेष लक्ष द्यायला हवे. आपल्याला हे जमले की आपण मोठमोठ्या ऑर्डर्स मिळवू शकतो. लग्नसमारंभ, बारसे, मुंज, वाढदिवस, साखरपुडा, पार्टी अशा अनेक ठिकाणी उद्योगाच्या या संधी केटरिंग व्यवसायाला आहेत.

५. डिझायनर कपडे भाड्याने देणे : डिझायनर कपडे म्हणजे एकच पीस. युनिक आणि वेगळे. केवळ ती एकच डिझाईन उपलब्ध असते. अशा कपड्यांना आता खूप मागणी असते. विशेषत: लग्न समारंभात प्रत्येकालाच सुंदर आणि वेगळे दिसायचे असते. त्यामुळे आपल्या कपड्यावर रंगसंगतीवर आणि त्याच्या डिझाईनवर विशेष भर दिला जातो.

त्यामुळे या कपड्यांची किंमतही फार असते. असे कपडे समारंभात एकदाच वापरले जातात त्यामुळे नंतर ते असेच राहतात. आपण केलेला खर्च आपल्याला नंतर लक्षात येतो पण त्यावेळेस आपली हौस मौज महत्त्वाची असते. म्हणूनच आता लोकं सजग झाली आहेत.

लोक कार्यक्रमासाठी एक दिवसापुरते कपडे भाड्याने घेतात. यात दोघांचाही फायदा असतो. ग्राहकाला त्याच्या आवडीचे कपडे हे कमी किमतीत मिळतात आणि व्यावसायिकाला त्याचे भाडे मिळते. केवळ लग्नसमारंभ नव्हे तर इतरही अनेक कार्यक्रमात अशा विविध कपड्यांची मागणी असते. याचा नीट अभ्यास करून जर या व्यवसायाकडे वळलं तर खूप मोठे आहे उद्योगसंधी यात दडलेली आहे.

– टीम स्मार्ट उद्योजक


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!