‘बदल’ हा जसा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, तसाच तो बिझनेस, इंडस्ट्री व उद्योग व्यवसायाचा पण अविभाज्य भाग आहे. त्यामुळे बदल करायला घाबरू नका. तुम्ही जर बदल स्विकारला नाही तर तुम्ही नगण्य व्हाल. त्याच त्याच गोष्टी परत परत करण्याच्या मानसिकतेमध्ये अडकून पडू नका, त्यामुळे कंटाळाल.
अयशस्वी होत असतानासुद्धा काही बिझनेस चालतच असतात ते एक प्रकारच्या अंतरीक ऊर्जेमुळे. या अपयशातूनच या कंपन्या प्रगती साधत असतात ते कशामुळे? कारण व्यवसायातले अपयश हे तुम्ही प्रयत्न करता आहात याचे प्रतीक असते. ते नव्या पद्धतीने कंपन्यांची पुन्हा रचना करत असतात.
नवी क्षेत्रे शोधून काढून त्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत असतात. नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करीत असतात. नवीन पाण्यात शिरायचा प्रयत्न करीत असतात.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१२३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹३२१ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)‘सॅमसंग’चे उदाहरण पाहा. त्यांनी कित्येक असे बिझनेस केले की त्यांचा परस्पराशी काही संबंध नाही, पण परिस्थितीनूसार ते बदलत गेले. नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश करत गेले व नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत गेले.
स्वतःच्या कंपन्यांचा नव्याने शोध घेत नवीन कल्चर आत्मसात करत गेले. त्यामुळेच आज ‘सॅमसंग’ ही मोबाइल उत्पादन क्षेत्रातली एक अग्रगण्य कंपनी आहे.
बदल हाच आयुष्यातील भाग आहे हे लक्षात ठेवा. यशाचा कोणताही परफेक्ट फॉर्म्युला नाही. त्यामुळे सतत प्रयत्न करत राहा. योग्य वेळी बदल करत राहा. केव्हा ना केव्हा तरी तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल याची खात्री बाळगा. आपला व्यवसाय किंवा उद्योग यशस्वी करा.
आयुष्यात यश मिळवा. अर्थात आपण आयुष्यात व बिझनेसमध्ये यशस्वी व्हायचे की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे. नाही का?
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.