Advertisement
उद्योगोपयोगी

क्राउडफंडिंग ठरू शकते नवउद्योजकांसाठी संजीवनी

'स्मार्ट उद्योजक' मासिकाच्या २० प्रिंट अंकाचा सेट (३ दिवाळी अंक समाविष्ट) फक्त ₹४०० मध्ये उपलब्ध. स्टॉक मर्यादित. बुक करण्यासाठी - https://rzp.io/l/2BfpgK4v

आजघडीला मराठी उद्योजकांसमोरील सर्वात मोठी अडचण म्हणजे गुंतवणूक. भारतात सामान्यपणे आपापल्या समाजाला मदत करण्याचा एक प्रघात आहे. त्यानुसार गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी इत्यादी समाजांतील लोक आपल्या समाजातील नवउद्योजकांना पुढे येण्यासाठी सर्व प्रकारची मदत करतात. त्यामुळे या समाजांतील नवउद्योजकांना भांडवलाची फारशी चिंता करावी लागत नाही, पण मराठी समाजात हे चित्र उलट आहे.

मराठी समाजाला उद्योग-व्यापाराची फारशी पार्श्वभूमी नसल्यामुळे मराठी नवउद्योजकांना भांडवल उभे करण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागते. क्राऊडफंडिंग म्हणजे लोकांकडून वर्गणी काढून त्याद्वारे पूर्णत्वाला नेलेली एखादी गोष्ट.


फक्त ₹१२३ मध्ये 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे आजीवन वर्गणीदार व्हा!

या वर्गणीत या आधीची ६५+ मासिके आणि पुढे दर महिन्याला व्हाट्सएप वर ताजे मासिक मिळवा. आजच नोंदणी करा : https://rzp.io/l/smartudyojak

आपल्याकडे जे जे सण-उत्सव हे लोकवर्गणी काढून साजरे केले जातात ती सगळी क्राऊडफंडिंगची उदाहरणे आहेत. आपण भारतीय अर्थ आणि व्यापार यापेक्षा सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाला जास्त महत्त्व देतो, त्यामुळे लोकवर्गणीतून उभे राहिलेले उपक्रम हे सांस्कृतिक व सामाजिकच पाहायला मिळतात. मात्र अमेरिकेमध्ये याच क्राऊडफंडिंगचा उपयोग उद्योगाच्या भांडवल उभारणीसाठी करण्याची सुरुवात २०१२ पासून झाली. अनेक नवउद्यमींना क्राऊडफंडिंगद्वारे भांडवल उभे करून व्यवसायाची सुरुवात करणे सोयीचे होऊ लागले. लवकरच भांडवल उभारणीची ही संकल्पना युरोपसह सर्व प्रगत देशांनी स्वीकारली.

भारतात परंपरेने चालत आलेला लोकवर्गणीचा उपक्रम आता पश्चिमेकडून क्राऊडफंडिंगच्या रूपात नव्याने परत आला आहे. मात्र आपल्याकडे याबद्दल कायदे व नियम अद्याप तितकेसे स्पष्ट झालेले नाहीत. मात्र केवळ भांडवल किंवा आर्थिक समस्येमुळे सुरू होऊ शकत नसलेल्या किंवा वाढ होऊ शकत नसलेल्या नवउद्योगांसाठी क्राऊडफंडिंग म्हणजेच लोकवर्गणीतून उभे केलेल्या भांडवलनिर्मिती ही संजीवन ठरणार आहे. हे आपण एका उदाहरणावरून पाहू…

एखादा उद्योग सुरू करण्यासाठी २ लाख रुपयांच्या भांडवलाची आवश्यकता असेल, पण त्या उद्योजकाकडे ते भांडवल नसेल तर त्याला ते बँक वा अन्य ठिकाणांहून कर्जरूपात उभे करावे लागते किंवा एखाद्या गुंतवणूकदाराकडून ते घेतल्यास त्याला समभागांचा मोठा हिस्सा म्हणजेच भागीदारी द्यावी लागते. त्याऐवजी छोट्या गुंतवणूकदारांकडून छोट्या-छोट्या रकमा ज्या त्यांना देणे अगदी सहज साध्य होईल अशा घेऊन त्यातून भांडवल उभे करता येऊ शकेल.

Reward based crowdfunding

Reward based crowdfunding म्हणजे एखादा उद्योग सुरू करण्यासाठी जी गुंतवणूक लागते, ती गुंतवणूक त्याच्यात जे छोटे गुंतवणूकदार असतील त्या छोट्या गुंतवणूकदारांना त्याचा चांगला मोबदला देते. उदा. एखाद्या उद्योजकाला वेबसाइट बनवणारी कंपनी सुरू करायची आहे आणि त्याला त्यासाठी ५० हजार रुपयांचे भांडवल लागणार आहे. त्याने रिवॉर्ड बेस्ड क्राऊडफंडिंग करायचे ठरवले, तर तो दहा लोकांकडून प्रत्येकी ५ हजार रुपयांचे योगदान घेऊ शकतो.

त्याच्या व्यवसायात क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून ज्या दहा लोकांनी ५-५ हजार रुपयांचे योगदान दिले आहे त्यांना तो बाजारात जी वेबसाइट तयार करायला साधारण १० ते १५ रुपये खर्च येतो ती त्या ५ हजार रुपयांत करून देईल. क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून योगदान देणार्‍या त्या दहा जणांनी नवउद्योगात योगदान केल्यामुळे त्यांना त्यांच्या गुंतवणुकीच्या दुप्पट ते तिप्पट लाभ मिळाला. याच्या दुसर्‍या बाजूला त्या नवउद्यमीला कोणतेही कर्ज आणि व्याज या चक्रात न अडकता स्वतःचा उद्योग सुरू करता आला. अशा प्रकारच्या क्राऊडफंडिंगमध्ये नवउद्यमी व योगदानकर्ता या दोघांनाही फायदा म्हणजेच विन-विन स्थिती आहे.

या क्राऊडफंडिंगमध्ये कोणतीही बेकायदेशीर बाब किंवा गैरप्रकार नसून याला तांत्रिकदृष्ट्या पूर्व-विक्री, आगाऊ विक्री म्हणजेच प्री-सेल किंवा ऍडव्हान्स सेल म्हटले जाते. यामध्ये उद्योजक योगदानकर्त्याकडून एक प्रकारे आगाऊ रक्कम घेऊन नंतर त्याच्या उत्पादनाचा लाभ योगदानकर्त्याला देतो. यात योगदानकर्त्याला हा फायदा होतो की, तो छोट्या स्वरूपात एका उद्योगउभारणीला हातभार लावतो.

– शैलेश राजपूत
(लेखक ‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाचे संपादक आहेत.)


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

error: Content is protected !!