ई-कॉमर्स व्यवसाय करून दहा वर्षांत कमवा आयुष्यभर पुरतील इतके पैसे

मित्रहो, ई-कॉमर्सची संधी चालून आली आहे, हीच ती संधी आहे की, ज्याद्वारे आपण महाराष्ट्रातील प्रत्येक घरात एक उद्योग उभा करू शकतो व गरिबी, बेकारी, अज्ञान दूर करून प्रत्येक घर श्रीमंत सुजलाम सुफलाम करू शकतो.

आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, त्यामुळे त्याच्या हातात इंटरनेट आहे, पुढील 10 वर्षांत सुमारे 65 कोटी लोक इंटरनेट वापरत असतील, म्हणजे 65 कोटी ग्राहक पूर्ण भारतात रोज ऑनलाइन असतील ही एवढी मोठी बाजारपेठ पाहूनच अलिबाबा, स्नॅपडील फिल्पकार्ट, ईबे इत्यादी कंपन्या जोरदार जाहिराती करत आहेत.

त्या सर्व कंपन्यांनी मार्केट रीसर्च केला आहे. त्यांना माहीत आहे की, पुढील दहा वर्षांत आपण जेवढे कमवू तेवढे पुढील 10 पिढ्यांना पुरून उरेल.

आकडेवारी :

  • 70% शॉपिंग हे केवळ मोबाइलवर होईल.
  • 2020 पर्यंत भारतातील 65% लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचलेले असेल.
  • 2020 पर्यंत भारत हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा इंटरनेट वापरणारा देश असेल.
  • 2020 पर्यंत भारतात जवळजवळ 5 लाख खेड्यांतून लोक ऑनलाइन शॉपिंग करत असतील.
  • 2020 पर्यंत अशी एकही वस्तू किंवा सेवा असणार नाही जी तुम्हाला ऑनलाइन मिळणार नाही.
  • 2020 पर्यंत आज जसे 4-5 वर्षांच्या मुलाला शेजारील चॉकलेटचे दुकान माहीत असते तसे सर्व ऑनलाइन शॉपिंगच्या कंपन्यांची नावे माहीत असतील.

आपण काय केले पाहिजे :

संधीचे जर तुम्ही सोने नाही केले तर भविष्यात फक्त पश्चात्तापाशिवाय तुमच्या हातात काहीही नसेल, जसे दिवाळी संपल्यावर फटाक्याचे दुकान टाकून काय उपयोग तसे. पुढील 10 वर्षांत या क्षेत्रात तुफान पैसे कमवण्याची संधी आहे. लवकर जागे व्हा, गंगा वाहत आहे, हात धुऊन घ्या.

ही संधी म्हणजे जणू काही कुबेर देवच तुमच्या घरी राहण्यास आले आहेत. ही संधी सचिन बन्सलनी ओळखली व 10 हजारांत सुरू केलेले फ्लिपकार्ट आज 40 हजार कोटींचे झाले.

इंटरनेटवर आज तासन्तास वेळ खर्च करून ई-कॉमर्स इंडस्ट्री व आलेल्या संधीबद्दल पूर्ण माहिती करून घ्या आणि जमेल तेथून व्यवसाय सुरू करा.

ई-कॉमर्स सर्वाधिक प्रचंड वेगाने वाढणारा बिझनेस आहे. नोकरीच्या पाठीमागे न लागता ई-कॉमर्सच्या संधीचा फायदा करून घ्या व पुढच्या 10 वर्षांत पूर्ण आयुष्यभर पुरतील इतके पैसे कमवा. एवढी मोठी बाजारपेठ पाहूनच अलिबाबा, स्नॅपडील, फिल्पकार्ट, ईबे इत्यादी कंपन्या जोरदार जाहिराती करत आहेत.

त्या सर्व कंपन्यांनी मार्केट रीसर्च केला आहे. त्यांना माहीत आहे की, पुढील दहा वर्षांत आपण जेवढे कमवू तेवढे पुढील 10 पिढ्यांना पुरून उरेल. 2020 पर्यंत 70% शॉपिंग हे केवळ मोबाइलवर होईल, भारत हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा इंटरनेट वापरणारा देश असेल, 5 लाख खेड्यांतून लोक ऑनलाइन शॉपिंग करत असतील. अशी एकही वस्तू किंवा सेवा असणार नाही जी तुम्हाला ऑनलाइन मिळणार नाही.

दहा स्टेप्स : ह्या व्यवसायात ज्यांनी उतरवायचे ठरवले आहे, त्यांनी नेमक्या कोणत्या पद्धतीने काम सुरू केले पाहिजे याच्या एकूण 10 स्टेप्स.

१. अभ्यास : या व्यवसायात येण्यासाठी प्रथम सखोल अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. इंटरनेटवर वेळ खर्च करून, पुस्तके, मासिके वाचून तसेच काही तज्ज्ञ सल्लागारांची भेट घेऊन काही महिने या व्यवसायाची जितकी मिळेल व शक्य होईल तेवढी माहिती घेणे आवश्यक आहे. जितकी जास्त माहिती तितका या इंडस्ट्री व व्यवसायाचा आराखडा तुमच्या लक्षात येईल.

२. आयडिया : अभ्यास करत असतानाच तुम्हाला तुमच्या भविष्यातील व्यवसायाबद्दल एक चांगली आयडिया शोधून काढावी लागेल. वन आयडिया कॅन बी बिलियन डॉलर. व्यवसाय सुरू करण्यापूर्वीच तुम्हाला सापडलेली आयडिया ही कोट्यवधी रुपये किमतीची असू शकते. आयडिया जितकी चांगली तितके मोठे यश या व्यवसायात मिळू शकते.

३. मार्केट रीसर्च : तुम्ही ज्या आयडिया प्रॉडक्ट सेवा देण्यासाठी ई-कॉमर्स व्यवसाय सुरू करणार आहात, त्याचा सखोल मार्केट रीसर्च करणे महत्त्वाचे आहे, ही आयडिया चालेल का? त्याची चाचणी घेणे आवश्यक आहे. अनेक तज्ज्ञ, सल्लागार, अनुभवी व्यक्ती, काही ग्राहकांना उत्पादक, व्यवसाय यासंबंधी भेटणे गरजेचे असते, त्यावरून तुम्हाला अनेक अंदाज बांधता येतील.

४. बिझनेस प्लॅन : जसे घर, बंगला बांधताना आपण अगोदर इंजिनीयरकडून नकाशा तयार करून घेतो, तसा तुमच्या भविष्यातील नियोजित व्यवसायाचा अति उत्तम प्लॅन व्यावसायिक व तज्ज्ञ व्यक्तीकडून बनवून घेणे आवश्यक आहे. तुम्ही स्वत: भरपूर वेळ व मेहनत केली तर हा प्लॅन बनवू शकाल.

५. अर्थसाहाय्य : हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपणाकडे पैसा कोठून व कसा उपलब्ध होईल, याची पूर्ण योजना तयार असावी. स्वत:कडे किती आहेत, कुटुंबाकडून किती घेऊ शकतो, शासकीय योजनेतून किती शक्य आहेत, बँका किती देऊ शकतात, व्हेंचर कॅपिटल, अँजल, गुंतवणूकदाराकडून किती व कसे शक्य आहे याची पूर्ण माहिती व योजना तयार केलेली हवी.

६. कंपनी फॉरमेशन : हा व्यवसाय अत्यंत प्रोफेशनलरीत्या करण्यासाठी तुम्हाला एक प्रा.लि. कंपनीची स्थापना करावी लागेल, त्यासाठी लागणारे संचालक कोण असतील, एम.डी. कोण असेल, कोणाचे किती भांडवल असेल, कार्यालय कोठे असेल, त्यासाठी लागणार्‍या सर्व कागदपत्रांची जुळवणी करून ही कंपनी फॉरमेशन, व्हॅट नोंदणी, सी.एस.टी. नोंदणी, प्रोफेशनल कर नोंदणी, शॉप अ‍ॅक्ट नोंदणी, कंपनीचे करंट अकाऊंट इत्यादी सर्व्हे करून घ्यावे लागेल.

७. पोर्टल : जशा तुम्हाला आज फ्लिपकार्ट, नापतोल, स्नॅपडील, ईबे इत्यादी असंख्य ई-कॉमर्स पोर्टल दिसतात, तसेच तुम्हाला तुमचे स्वत:चे अति उत्तम असे पोर्टल बनवावे लागेल. त्यासाठी लागणार्‍या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेऊन तशा तज्ज्ञ सॉफ्टवेअर व डिझाईन कंपनीकडून तुम्ही बनवून घेऊ शकता. असे पोर्टल तयार झाल्यावर तुम्ही त्यावर उत्पादने विकण्यास सुरू करू शकता.

८. मार्केटिंग : तुमचे ई-कॉमर्स पोर्टल तयार झाले- त्यावर बरेच प्रॉडक्ट्स विक्रीस ठेवल्यानंतर ते लोकांना माहीत झाले तरच त्याची विक्री होईल. त्यासाठी या पोर्टलचे अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने मार्केटिंग करावे लागेल. यामध्ये सर्च इंजिन, सोशल मीडिया, ई-मेल, अ‍ॅप्स, इव्हेंट्स, वृत्तपत्र इत्यादी अनेक पद्धतीने तुम्ही मार्केटिंग करू शकता.

९. ऑपरेशन्स : यामध्ये आपल्या व्यवसायाचे दैनंदिन कामकाज कसे चालणार याची योजना हवी. उदा. प्रॉडक्ट कोठून येतील, ग्राहकांनी खरेदी केल्यावर कोणती कुरिअर कंपनी ते पोहोचवते, पैशाचा हिशोब कोण ठेवणार, पोर्टल मॅनेजमेंट कोण करणार, अगदी कार्यालय कोण सांभाळणार म्हणजे शिपायापासून ते अगदी कंपनीच्या एम.डी.पर्यंतचे दैनंदिन कामकाज यामध्ये येईल.

१०. विस्तार : एकदा का तुमचे ई-कॉमर्स सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरू झाले, की त्यावर हळूहळू प्रॉडक्ट वाढवणे, आपले प्रॉडक्ट जगभर कसे जास्तीत जास्त विकले जातील ते पाहणे, नवीन अधिक कौशल्यपूर्ण कर्मचाराची नियुक्ती करणे, सतत नवीन अर्थसाहाय्य कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणे, सतत रीसर्च व डेव्हलपमेंट करणे इत्यादीचा विस्तार करणे.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?