‘ERP System’ तुमच्या व्यवसायात कशी उपयुक्त ठरेल?

सर, मला ERP घ्यायची आहे.

कशाला उगाच खर्च?

काही फायदा होईल?

खूप महाग आहे.

खूप गोष्टी सोप्या होतील.

Manual MIS बरी सॉफ्टवेअरच्या खूप समस्या असतात.

आमच्या छोट्या व्यवसायासाठी काय करायची ERP?

सर ERP (Enterprise Resource Planning) की MIS (Management Information System)?

बिझनेस मॉडेल आणि ERP यात काही संबंध आहे का?

अशा अनेक शंका क्लायंट विचारत असतात. ERP कंपन्या आणि ERP User कंपन्या, लहान आणि मोठ्या, अशा दोन्ही माझ्या ग्राहक आहेत, त्यामुळे मला दोन्ही बाजूंनी विचार करायला मिळतो.

(इथून पुढील लेखात आपण MIS आणि ERP साठी ERPच म्हणणार आहोत.)

ERP कडे आपण कसे पाहतो? खर्च की गुंतवणूक?

ERP ही खर्च आहे आणि गुंतवणूकसुद्धा. ERP ही खर्च आहे कारण आपण ती खरेदी करतो. आता ती गुंतवणूक कशी ते पाहू. एका मोठ्या आणि छोट्या व्यवसायात याने काय फरक पडतो ते पाहू. सुरुवातीला एका मोठ्या उद्योगात काय फरक पडतो ते पाहू.

माझे एक ग्राहक आहेत, त्यांनी ERP घेतली. आता मुलगा आणि वडील अशी आघाडी सुरू झाली आणि मध्ये मी. दोघेही मालक आणि दोघेही आपापल्यापरीने बरोबर. वडील म्हणाले, इतके दिवस झाले, फायदा काय झाला? मुलगा म्हणाला, थोडा वेळ लागणार. ERP मुळे Purchase and stores नीट झाले ना? बाकी सगळेही होईल. थोडा धीर धरा. नेहमी मला म्हणत होता, आता काय झाले?

मी सल्लागार म्हणून हा प्रश्न माझ्यासमोर आला. मी परिस्थिती लक्षात घेऊन त्यात लक्ष घातले. लोकांनी आपल्या समस्या सांगायला सुरुवात केली. डेटा एंट्री करायला खूप वेळ लागणार, ERP स्लो आहे, वगैरे वगैरे. ह्यातील काही खर्‍या आणि काही खोट्या समस्या. खर्‍या आणि खोट्या आधी वेगळ्या केल्या. खर्‍या सोडवायला घेतल्या आणि खोट्या लिहून ठेवल्या.

डेटा नको इतका मागितला जात असल्याने खूप वेळ लागणार होता. ERP कंपनीशी बोलून आवश्यक तेवढाच डेटा एंट्री करण्याचे ठरविले. त्यामुळे वेळ आणि श्रम दोन्हीची बचत झाली. कंपनीमध्ये डेली मीटिंग मी सुरू केली होती, पण डेटा नसल्याने ERP डेली मीटिंगसाठी वापरली जात नव्हती. आता डेटा एंट्री कमी झाल्याने रोजच्या रोज डेटा आणि MIS रिपोर्ट दररोज मीटिंगसाठी वापरला जाऊ लागला.

त्यामुळे आता सगळे जण ERP वापरू लागले. त्यामुळे ERP चा फायदा वाढू लागला. आतापर्यंत ERP खर्च होता, आता गुंतवणूक होऊ लागली. एक प्लॅन बनवून ERP चा वापर वाढवण्यात आला. यामध्ये सगळे जण सहभागी झाले, पण पुढाकार हा वरिष्ठ व्यवस्थापनाचा होता आणि त्यासाठी प्लान होता म्हणून हे शक्य झाले. पुढील वर्षात कंपनीने सगळे विभाग म्हणजे, production, maintenance, quality and dispatch ठिक ठाक केली.

जर का वापरला नाही तर ERP हा फक्त खर्च आहे आणि जर का वापरला तर गुंतवणूक आहे.

आता वापर कसा वाढवायचा?

ERP आपल्याला डेटा इनफरमेशनमध्ये convert करून देते. आपल्या दुकानात रोज झालेल्या मालाची विक्री किंवा कारखान्यात रोज झालेल्या मालाचे उत्पादन हे जर का आपण रोज ERP मध्ये नमूद केले तर ह्या माहितीवरून ERP आपल्याला पुढील आठवड्यात किती कमी किंवा जास्त विक्री किंवा उत्पादन करायचे आहे ते सांगेल.

आता ही माहिती आपण जर का वापरली तर आपण आपले प्लान यशस्वी करू शकतो आणि तेव्हा आपल्या ERP चा खर्च वसूल होवून ती गुंतवणूक होते. एक साधे उदाहरण घेऊ. तुम्ही प्रवासाला निघाला अहात. आता एअरपोर्टवर किंवा रेल्वे स्थानकावर गेल्यानंतर तुम्हाला समजले की, फ्लाइट किंवा रेल्वे तीन तास उशिरा आहे तर किती त्रास होतो? हेच जर तुम्हाला आधी समजले तर?

MIS मुळे हे शक्य होते. तीच अवस्था आपल्या व्यवसायातसुद्धा असते. आपल्याला माहिती वेळेत मिळाली तर निर्णय घेणे सोपे होते आणि सोपे निर्णय हे अचूक असण्याची शक्यताही वाढते. जास्त अचूक निर्णय म्हणजे कमी नुकसान आणि जास्त फायदा आणि जास्त फायदा म्हणजे ERP is an investment.

आता एका छोट्या उद्योगात काय फरक पडतो ते पाहू.

छोट्या उद्योगात सर्व गोष्टी एकच व्यक्ती पहात असते त्यामुळे ERP ची गरज जास्त असते, पण अशी ERP मिळणे कठीण आहे. अशा वेळी वापरकर्त्या कंपनीने काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

  • आपल्याला नक्की काय फायदा होणार आहे
  • हा फायदा कसा होणार आहे
  • ह्या करता प्लान काय आहे
  • ह्या करता शेडुल काय आहे
  • ERP कंपनी काय करणार आहे
  • आपल्याला काय करावे लागणार आहे
  • आपण नक्की कुठल्या गोष्टी वापरणार आहोत
  • कुठल्या कुठल्या गोष्टी आपण नेहमी वापरणार आहोत
  • कुठल्या गोष्टी आपण नंतर वापरणार आहोत

अशा अनेक छोट्या कंपन्या आहेत ज्यानी खूप छान ERP वापरली आहे माझ्या एका क्लायंटकडे ERP वापरून रोजचे काम सुरळीत करून दिले आहे. सेवा उद्योगंमध्येसुद्धा ERP मुळे Client Service Time कमी करून दिला आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील. तुमच्या उद्योगातही ERP सुरू करता येईल.

– महेश साठे
(लेखक हे एक व्यावसायिक सल्लागार आहेत)
९४२२६८२८१४

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?