आपण आंतरराष्ट्रीय व्यापारात आहोत. तेव्हा येथे जसे प्रत्यक्ष उत्पादनाला महत्त्व आहे त्याचप्रमाणे त्या उत्पादनाच्या गुणवत्तेला (Quality) आणि एकंदरीतच प्रमाणाला (Quantity) ही अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या सर्व बाजू सक्षमपणे सांभाळणाऱ्या उत्पादक व्यावसायिकास (Manufacturer) / पुरवठादारास (Supplier) ही तेवढेच किंबहुना त्यापेक्षा अधिक महत्त्व आहे.
बर्याच वेळा असे लक्षात येते एकवेळ परदेशी बाजारपेठेत ग्राहक शोधणे सोपे होते, परंतु दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देणारे स्वदेशी उत्पादक / पुरवठादार शोधणे आव्हानात्मक ठरते.
आपण जर व्यापारी निर्यातदार म्हणून जागतिक बाजारपेठेत उतरणार असाल तर आपल्याला उत्पादन ठराविक वेळेत उपलब्ध करून देणारे सहयोगी उत्पादक / पुरवठादार शोधणे क्रमप्राप्त आहे आणि तेही आपल्या निर्यात व्यवसायास सहाय्य करणारे असणे आवश्यक आहे; कारण व्यापारी निर्यातदार म्हणून आपला सर्व निर्यात व्यवसाय याच पुरवठादारांच्या सहयोगावर अवलंबून आहे; हे येथे लक्षात ठेवले पाहिजे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून येणारी ऑर्डर ही महत्तम प्रमाणात असते; वजनाच्या एककांमध्ये मांडायचे झाल्यास टनांमध्ये असते, त्यामुळे एकाच पुरवठादारावर अवलंबून राहणे बऱ्याचदा जोखमीचे ठरू शकते, याचकरिता एकापेक्षा अधिक पुरवठादार असणे केव्हाही चांगले.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१२३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹३२१ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)आपण व्यापारी निर्यातदार म्हणून एखादे उत्पादन निर्यातीकरिता निवडले असेल तर सर्वप्रथम ते उत्पादन भारतात सर्वात जास्त कुठल्या भागात उत्पादित होते हे आपण शोधण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी आपल्याला इंटरनेटचा चांगला उपयोग होईल. उदा. गहू- उत्तर भारत.
अशाप्रकारे शोध घेतल्यानंतर त्या प्रदेशात कार्यरत असलेेल्या स्थानिक चेंबर ऑफ कॉमर्सशी संपर्क साधावा त्यांच्याकडून आपल्या उत्पादनाच्या सर्व उत्पादक संस्थांची माहिती घेऊन त्यापैकी काही संस्थांना संपर्क करून त्यांना आपल्या व्यवसायाबद्दल माहिती द्यावी तसेच त्यांना सहयोग देण्यास प्रवृत्त करावे.
आपण यापूर्वीच्या लेखांमध्ये पाहिले आहे, निर्यातदारांकरता भारत सरकारतर्फे प्रत्येक उत्पादनपरत्वे एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलची निर्मिती केली आहे. आपण अशा कौन्सिल चे सदस्यत्व ही घेणे फायदेशीर ठरू शकते.
कौन्सिल आपल्याला योग्य उत्पादक / पुरवठादार संस्थेपर्यन्त पोहोचण्यास सहाय्य करते. उत्पादनपरत्वे सध्या अशा ३५ कौन्सिल आजमितीला कार्यरत आहेत. त्यांची सर्व माहिती गूगलवर सहज उपलब्ध आहे.
याशिवाय, आज इंटरनेट आपल्या सुविधेसाठी आहेच. याच इंटरनेटवररूनच आपण आपल्या उत्पादनसापेक्ष उत्पादक वा पुरवठादार संस्थापर्यन्त थेट पोहोचता येते. तरी त्यांचा ही लाभ आपण घेऊ शकता.
– सौरभ दर्शने
निर्यातदार व विदेश व्यापार सल्लागार, मुंबई
संपर्क : ८१०४० ५५४८९
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.