Advertisement
उद्योगोपयोगी

व्यवसाय मग तो छोटा असो की मोठा सर्वात महत्त्वाचे आहे ‘उद्यम रजिस्ट्रेशन’ | जाणून घ्या त्याचे सर्व फायदे

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


सूक्ष्म, लघु किंवा मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक उद्योजकाने आपल्या व्यवसायाचे ‘उद्यम रजिस्ट्रेशन’ करणे नुसते गरजेचेच नाही तर अनिवार्य आहे. ही नोंदणी पूर्णपणे मोफत आहे आणि तुम्ही घरच्या घरी ऑनलाइन करू शकता.

‘उद्यम रजिस्ट्रेशन’ केल्यानंतर तुम्हाला कायमस्वरुपी नोंदणी क्रमांक मिळतो. नोंदणी पूर्ण झाल्यावर त्याचे प्रमाणपत्रही ऑनलाइन उपलब्ध होते. एकदा ही नोंदणी केली की त्याचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता नसते.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

ही नोंदणी करताना तुम्हाला कोणतीही कागदपत्रे upload करावी लागत नाहीत. फक्त तुमचा आधार क्रमांक नोंदवावा लागतो. Sole proprietorship मध्ये मालकाचे, भागीदारी फर्ममध्ये managing partner, हिंदू अविभक्त कुटुंब असेल तर कर्त्याच्या आधारावर उद्यम नोंदणी केली जाते. कंपनी, एलएललपी, सोसायटी किंवा ट्रस्टच्या बाबतीत त्याच्या अधिकृत स्वाक्षरीकर्त्याच्या आधारवर ‘उद्यम रजिस्ट्रेशन’ केले जाते.

‘उद्यम रजिस्ट्रेशन’ प्रणाली ही पूर्णपणे ऑनलाइन सिस्टम असून आयकर विभाग व GST शी संलग्न केली आहे.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची व्याख्या

सूक्ष्म उद्योग – ज्या व्यवसायात प्लांट व यंत्रसामुग्रीमधील गुंतवणूक ही १ कोटींच्या आत असेल आणि वार्षिक उलाढाल ही ५ कोटींच्या आत असेल अशांना सूक्ष्म उद्योग या श्रेणीत गणले जाते.

लघु उद्योग – ज्या व्यवसायात प्लांट व यंत्रसामुग्रीमधील गुंतवणूक ही १० कोटींच्या आत असेल आणि वार्षिक उलाढाल ही ५० कोटींच्या आत असेल अशांना लघु उद्योग या श्रेणीत गणले जाते.

मध्यम उद्योग – ज्या व्यवसायात प्लांट व यंत्रसामुग्रीमधील गुंतवणूक ही ५० कोटींच्या आत असेल आणि वार्षिक उलाढाल ही २५० कोटींच्या आत असेल अशांना सूक्ष्म उद्योग या श्रेणीत गणले जाते.

५० कोटींच्या वर गुंतवणूक असलेले आणि २५० कोटींहून अधिक वार्षिक उलाढाल असलेले उद्योग हे MSME क्षेत्रात गणले जात नाहीत. या उद्योगांना ‘उद्यम रजिस्ट्रेशन’ करण्याची आवश्यकता नाही व त्यांना MSME साठी असलेल्या योजनांचे लाभही मिळत नाहीत.

या पूर्वी व्यवसायाचे ‘उद्योग आधार’ किंवा ‘Entrepreneur Memorandum 1’ किंवा ‘Entrepreneur Memorandum 2’ काढले असेल तर त्याला आता ‘उद्यम रजिस्ट्रेशन’मध्ये परावर्तित करू शकता.

भारत सरकारच्या MSME मंत्रालयाच्या https://udyamregistration.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही कोणतेही शुल्क न भरता ही नोंदणी किंवा परिवर्तन करता येते. देशभरातील सुमारे ९४ लाख उद्योग आतापर्यंत याच्यावर नोंदणीकृत झालेले आहेत.

‘उद्यम रजिस्ट्रेशन’ करण्याचे फायदे

१. ‘उद्यम रजिस्ट्रेशन’द्वारे सरकार दरबारी तुमची नोंद अधिकृतरित्या MSME म्हणून होते. त्यामुळे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा स्थानिक संस्था MSME च्या कल्याणासाठी ज्या ज्या योजना राबवते, त्यांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र होता.

२. MSME क्षेत्राला वित्तपुरवठा करणे हे बँकांना बंधनकारक आहे. कर्जपुरवठा करण्यात MSME क्षेत्र हे priority sector मध्ये येते. त्यामुळे तुमच्याकडे हे प्रमाणपत्र असेल तर तुम्ही बँकेत ते दाखवून priority sector कोट्यातील कर्ज मिळवू शकता.

३. ‘उद्यम रजिस्ट्रेशन’ असल्यावर तुम्हाला व्यावसायिक कर्जाच्या व्याजदरात १.५ टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.

४. तुम्हाला बँकेत चालू खाते (current account) काढायचे असल्यास त्यासाठी उद्योगाच्या नावे दोन पुरावे असावे लागतात. ‘उद्यम रजिस्ट्रेशन’ हे त्यापैकी एक पुरावा म्हणून सादर करता येते.

५. तुम्हाला रेल्वेसकट विविध सरकारी विभागांचे टेंडर भरायचे असल्यास ‘उद्यम रजिस्ट्रेशन’ असल्यावर तुम्हाला प्राधान्य दिले जाते.

६. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स rebate सुद्धा मिळू शकतात.

७. पेटंट नोंदणी करताना नोंदणी शुल्कात सवलत मिळते.

८. क्रेडिट रेटिंग शुल्कात सवलत मिळते.

– शैलेश राजपूत


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!