स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
उद्योगाच्या बाबतीत भारत हा खूप समृद्ध देश मानला जातो. चहाच्या टपरीपासून करोडोंमध्ये उलाढाल असलेले विविध उद्योग भारतात चालतात; परंतु भारतात नक्की किती लोक व्यवसाय करतात हे मात्र मोजणे फार कठीण आणि याचमुळे अनेक वेळा या उद्योजकांसाठी योजना बनविताना, सोयीसुविधा उपलब्ध करून देताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात.
हाच प्रश्न समोर ठेवून MSME मंत्रालय, भारत सरकारने www.msmedatabank.in हे पोर्टल सुरू केले. यावर कोणताही उद्योजक आपला लघु किंवा मध्यम (Small or Micro) उद्योग नोंदवू शकतो. या डेटा बँकेचा वापर सरकारला योजना आखण्यात होतोच त्याशिवाय लोकांना या उद्योगांची माहिती मिळाल्याने लोक ह्यांकडून उत्पादने विकत घेऊ शकतात. तसेच मोठ्या कंपन्या त्यांचा कच्चा मालसुद्धा ह्या उद्योगांकडून विकत घेतात.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
या डेटाबँकेचा उपयोग नुसतीच उद्योगांची गणती करण्यासाठी होत नाही, तर गुंतवणूक, उलाढाल, कर्मचार्यांची संख्या, उत्पादने, विक्रीचे प्रमाण, क्रेडिट, जॉइंट व्हेंचर्स, तांत्रिकीकरण, आयात-निर्यात, भागभांडवल अशा अनेक घटकांची माहिती मिळवण्यासाठीसुद्धा होतो.
GSR ७५० (ए) अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस डेव्हलपमेंट (MSMED) नियम, २०१६ नुसार सर्व सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी आपली माहिती MSME डेटा बँकेच्या साहाय्याने सरकारपर्यंत पोहोचवावी.
जर एखादा सूक्ष्म, लघु किंवा मध्यम उद्योग MSME डेटा बँकेत नोंदवलेला असेल तरच सरकारने उपलब्ध करून दिलेल्या विविध योजनांचा त्या उद्योगाला लाभ करून घेता येईल.
MSME Databank नोंदणी करण्यासाठी :
- जर आपल्याकडे उद्योग आधार मेमोरेंडम असेल तर आपण http://www.msmedatabank.in/ या लिंकवर जाऊन नोंदणी करू शकता.
- जर आपल्याकडे उद्योग आधार नसेल तर आपण http://www.udyogaadhaar.gov.in या लिंकवर जाऊन मालक किंवा भागीदाराचे आधार वापरून आपल्या उद्योगाचे आधार काढू शकता.
- उद्योग आधार काढल्यावर आपण MSME डेटा बँकेत गरजेचे तपशील भरून नोंदणी करू शकता.
- सर्व तपशील भरल्यानंतर ‘submit’ या बटनावर क्लिक केले की, आपल्या नोंदविलेल्या ई-मेल आयडीवर आपला लॉग इन आयडी आणि पासवर्ड येईल.
- हा लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून आपण कधीही MSME डेटाबँकेच्या पोर्टलवर जाऊन आपल्या माहितीत सुधारणा किंवा बदल करू शकाल.
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.