‘कायझाला’ हे मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन उद्योजकांसाठी उपयुक्त असे मोबाईल app सुरू केले आहे. याद्वारे लोकांशी संपर्क करणे आणि आपल्या टीममधील सर्वांच्या कामावर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे. आपल्याला वारंवार लागणारी टूल्स या app मध्ये एकत्रितपणे दिलेली आहेत त्यामुळे आपण अधिक कार्यक्षम होऊ शकतो.
‘कायझाला’द्वारे आपल्या व्यवसायाच्या मुख्य कार्यालयातून सर्वांपर्यंत घोषणा, बातम्या पोचविणे आता सोपे झाले आहे. तसेच त्यावर पोल आणि सर्व्हेमार्फत इतर लोक आपला अभिप्रायही देऊ शकतात. जसे आपण जर ‘गेल्या महिन्यातील काम करताना मला पुढील दहा अडचणी आल्या’ असे पोस्ट केलेत आणि त्यावर एक पोल तयार केलात, तर त्यातील कुणाकुणाला कोणत्या अडचणी आल्या हे ते पोलमार्फत आपल्याला कळवतील. या app वरून आपण ग्रुपमध्ये बोलू शकतो त्यासोबत १:१ सुद्धा बोलू शकतो.
‘कायझाला’मध्ये दिवसेंदिवस अनेक नवीन टूल्सची वाढ होत आहे. या टूल्सना त्यांनी ऍक्शन्स असे संबोधले आहे, त्यातील काही विशेष ऍक्शन्स पुढीलप्रमाणे आहेत :
- चेकलिस्ट (कामे आणि त्यातील कोणती कामे झाली आहेत यांची यादी)
- जॉब्स (विविध व्यक्तींकडे विविध कामे सोपविणे)
- रिक्वेस्ट लोकेशन (समोरच्या व्यक्तीला एखादे ठिकाण नकाशावर दाखवायला सांगणे)
- सबमिट बिल्स (आपल्या ग्राहकांना किंवा इतर व्यक्तींना पावती पाठविणे ज्यात रक्कम, व्यक्तीचे नाव आणि फोटो आपण जोडू शकतो).
मायक्रोसॉफ्ट कायझाला अँड्रॉइड आणि iOS या दोन्ही प्रकारातील वापरकर्त्यांसाठी त्या त्या स्टोअरमध्ये मोफत उपलब्ध आहे.
- Android : https://play.google.com/store/apps/details?id=com.microsoft.mobile.polymer
- iOS : https://itunes.apple.com/in/app/microsoft-kaizala/id1112208399?mt=8
मायक्रोसॉफ्ट कायझाला डाउनलोड करण्यापूर्वी त्याच्या नियम आणि अटी वाचा : https://aka.ms/kaizala-eula
– शैवाली बर्वे
shaivalibarve@gmail.com
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.