स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
पैसा ही प्रत्येकाची गरज आहे आणि प्रत्येकालाच स्वत:च्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो कमी पडतो. त्यामुळे त्याला कर्जाचा आधार घ्यावा लागतो. मात्र कर्ज मिळवणे हे म्हणावे तितके सोपे नाही. त्यासाठी तुम्हाला ठरावीक नमुन्यात अर्ज करावा लागतो. तरच बँक वा अन्य वित्तपुरवठा करणार्या संस्था तुम्हाला आर्थिक सहकार्य करू शकतात.
अनेक जणांना बँक वा वित्तसंस्थांना लागणार्या नमुन्यात अर्ज करणे जमत नाही किंवा कठीण पडते, कारण त्यांना त्या गोष्टीचा अनुभव नसतो. त्यामुळे अशा अनेक एजन्सीज् तुम्हाला कर्ज मिळवून देण्यात सहकार्य करतात. कर्जासाठी योग्य पद्धतीत अर्ज तयार करणे, त्यासाठी लागणार्या कागदपत्रांची पूर्तता करणे, कर्जदाराला त्याच्या गरजेनुसार कुठून आणि किती कर्ज मिळू शकेल याचे मार्गदर्शन करणे आदी बाबी येतात. त्याचा मोबदला म्हणून ठरावीक शुल्क वा कर्जरकमेच्या ठरावीक टक्के रक्कम मिळते.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
आपल्यालाही आर्थिक वा बँकिंग क्षेत्राचे ज्ञान असल्यास आपण हा व्यवसाय सुरू करू शकता. गृहकर्ज, व्यापार कर्ज, वैयक्तिक कर्ज, मालमत्ता तारण कर्ज, सोने तारण कर्ज असे कर्जाचे विविध प्रकार असतात, त्यात तुम्ही ग्राहकांना सहकार्य करू शकता. शिवाय मोठमोठ्या कंपन्यांना प्रोजेक्ट फायनान्स लागते. त्यांची गरज ही काही करोड रुपयांचीसुद्धा असू शकते, अशा वेळी तुम्ही त्यांना प्रोजेक्ट लॉग होण्यासाठी सहकार्य करू शकता.
– टीम स्मार्ट उद्योजक
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.