Poor people don’t buy anything, rich people buy assets and middle class people buy liabilities and think that they’re assets.
हे वाक्य रॉबर्ट कियोस्की आपल्या ‘Rich Dad Poor Dad’ या पुस्तकात प्रभावीपणे सांगतात. १ एप्रिल २००० ला प्रकाशित झालेले ‘रिच डॅड पुअर डॅड’ हे पुस्तक फायनान्शिअल लिटरसी अर्थात आर्थिक ज्ञान याचे आजच्या काळातील महत्त्व सांगते.
रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक दोन वडिलांच्या आर्थिक दृष्टिकोनांबद्दल आहे – लेखकाच्या जैविक वडिलांचा (Poor Dad) आणि त्याच्या मित्राच्या वडिलांचा (Rich Dad). हे पुस्तक यातून सांगते की पैसे कसे कमवायचे यापेक्षा पैसे कसे गुंतवायचे, बचत करायची आणि आर्थिकदृष्ट्या सुज्ञ निर्णय कसे घ्यायचे हे शाळांमध्ये शिकवलं जात नाही.
आपल्याकडे पैसे येतील तेव्हा मोठी गाडी घेऊ, आपले स्वतःचे घर घ्यायला हवे म्हणजे एक मोठी इन्व्हेस्टमेंट होईल, असे बऱ्याच जणांना वाटते. रॉबर्ट यांच्या मते कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ‘पैसा’ हे नसते, तर आपले बुद्धिकौशल्य असते. त्यामुळे आपले पैसे नेमके कुठे गुंतवले पाहिजेत, ज्याने ते वाढत जातील हे रॉबर्ट या पुस्तकात सांगतात.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१२३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹३२१ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)आपल्यातल्या बऱ्याच जणांना असेही वाटते की, आपण कोणत्या कुटुंबात जन्माला येतो यावर आपण गरीब किंवा श्रीमंत मानले जातो. इतर बाबतीत हे खोटेही असेल; परंतु जेव्हा पैशांच्या बाबतीत बोलले जाते तेव्हा काही अंशी हे खरेच आहे, कारण श्रीमंत वडील आपल्या मुलांना जे शिकवतात ते गरीब वडिलांना माहीतच नसते; त्यामुळे ते आपल्या मुलांना त्यांना जितकं माहीत आहे तितकंच शिकवू शकतात.
श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत कसे होत जातात आणि गरीब लोक अधिकाधिक गरीब कसे होत जातात, हे आपल्याला या पुस्तकातून समजते. कारण श्रीमंतीचे आणि गरिबीचे मूळ कारण ते म्हणजे ‘पैसे’ हे श्रीमंत लोक कसे वापरतात आणि गरीब लोक कसे वापरतात हे रॉबर्ट यांनी या पुस्तकात स्पष्ट केले आहे.
📌 पुस्तकात मांडलेले मुख्य मुद्दे :
- शाळा आपल्याला पैसे कमवायला शिकवत नाही.
- संपत्ती निर्माण करण्यासाठी संपत्ती वाढवा आणि देणी कमी करा.
- नोकरी मिळवण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय किंवा गुंतवणूक शिका.
- आर्थिक शिक्षण हे यशस्वी जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहे.
- पैशासाठी काम करू नका, पैशाला तुमच्यासाठी काम करू द्या.
पुस्तकाच्या शेवटी रॉबर्ट काही पर्याय आपल्याला सांगतात, ज्याद्वारे आपण आतापासूनच श्रीमंतीकडे वाटचाल करू शकतो. मूळ इंग्रजी भाषेतील हे पुस्तक जगातील विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहे. सर्व पुस्तकांच्या दुकानात तसेच ऑनलाईनसुद्धा उपलब्ध होऊ शकते.
‘Rich Dad Poor Dad’ हे पुस्तक फक्त पैसे कमावण्याचं नव्हे, तर आर्थिक दृष्टिकोन बदलवण्याचं पुस्तक आहे. हे पुस्तक वाचून अनेक लोकांना आर्थिक स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली आहे. विशेषतः तरुणांनी हे पुस्तक वाचलंच पाहिजे!
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.