उद्योगोपयोगी

लॉकडाउननंतर पुन्हा व्यवसाय सुरू करताना…

स्पेशल ऑफर : ₹५०० प्रिंट मासिकाची वार्षिक वर्गणी भरा आणि डिजिटल अंकात अर्ध पान रंगीत जाहिरात मोफत मिळवा!
Book Now: https://imjo.in/Xx7Uq6

आता लॉकडाऊन संपल्यावर व्यवसाय पुन्हा मार्गी लावण्यासाठी आपण वेगवेगळी टार्गेट्स ठरवू. ती आपण व्यवस्थित विचार करून आणि शांतपणे ठरवायला हवी. घाईघाईत किंवा फार विचार न करता जर स्ट्रॅटेजी ठरवली तर तिचा दूरगामी परिणाम आपल्याला सहन करावा लागू शकतो.

स्ट्रॅटेजी ठरविताना पुढील बाबी लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

१. आत्मनिर्भर

सर्वात आधी डोक्यात हे पक्कं करा की लगेच कोणतीही गुंतवणूक किंवा मदत मिळणार नाही. सरकारी योजनांमधून किंवा इतर कोणत्या ठिकाणाहून मदत मिळाली तर उत्तमच. पण त्याची वाट बघत बसणे योग्य नाही. त्यामुळे आता आहोत त्या परिस्थितीतून काही केल्या बाहेर पडायचं आहे हे नक्की करा आणि कामाला लागा.


'स्मार्ट उद्योजक' डिजिटल मासिकाची आजीवन वर्गणी मिळवा फक्त ₹ १२३ मध्ये! सोबत आतापर्यंतचे सर्व अंकही मोफत मिळवा!

BOOK NOW: https://imojo.in/3x3a5zn


२. सध्याची परिस्थिती जाणून घेणे

लॉकडाऊन मुळे जसं नुकसान झालं आहे तशाच काही नवीन संधी सुद्धा समोर येत आहेत. आपल्या व्यवसायाच्या वेगवेगळ्या भागांवर याचा कसा परिणाम झाला आहे हा विचार करणे गरजेचे आहे. उदा. आपल्या सप्लायरच्या व्यवसायावर काय फरक पडला आहे, आपल्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती कशी आहे, इत्यादी.

३. नवीन मार्केटचा अभ्यास

कोरोना पूर्व आणि आता मार्केटमध्ये अनेक बदल झाले आहेत. लोक बदलले आहेत, त्यांच्या गरजा बदलल्या आहेत, त्यांची खर्च करण्याची शक्ती सुद्धा बदलली आहे. त्यामुळे आपल्या व्यवसायाला डोळ्यासमोर ठेवून सध्याच्या मार्केटचा अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे आहे.

४. फास्ट-रिकव्हरी ऑपरेशन (शॉर्ट टर्म टार्गेट्स)

वरील सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यावर एक फास्ट- रिकव्हरी प्लॅन ठरवावा. फास्ट रिकव्हरी प्लॅन म्हणजे अश्या काही गोष्टी करणे ज्याने आपल्याला कमीत कमी वेळात नुकसान भरून काढता येईल. उदा. असं एखादं उत्पादन काढणे ज्यात आपल्याला कमीत कमी खर्च येईल व जास्तीत जास्त नफा होईल.

यासाठी एक ठराविक रक्कम ठरवावी ज्याने आपला बहुतांश नफा भरून निघेल. त्या नंतर आपण जे उत्पादन विकणार आहोत त्याची किंमत ठरवावी. मग आपण ठरवलेली रक्कम गाठण्यासाठी किती उत्पादनं विकावी लागतील याचा विचार करून जास्तीत जास्त सहा महिन्यांचा प्लॅन तयार करावा. यामुळे १००% जरी नुकसान भरून निघालं नाही तरी काही प्रमाणात तरी नुकसान भरून काढता येईल.

५. कमप्लीट रिकव्हरी ऑपरेशन (लॉंग टर्म टार्गेट्स)

फास्ट-रिकव्हरी ऑपरेशन ठरवल्यानंतर त्यासोबतच कमप्लीट रिकव्हरी ऑपरेशनचा विचार करणेही तितकेच महत्वाचे आहे. कमप्लीट रिकव्हरी ऑपरेशन म्हणजे लॉकडाऊन मुळे आपल्या व्यवसायाच्या ज्या ज्या भागावर जितका परिणाम झाला आहे तो पूर्णपणे भरून काढणे. यात आर्थिक तोटा भरून काढण्यापासून नवीन उत्पादनांचा विचार, कर्मचाऱ्यांचा विचार, व्यवसाय वाढवता कसा येईल अशा अनेक गोष्टींची टार्गेट्स ठरवण्याचा समावेश असतो. यासाठी सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत वेळ लागू शकतो.

६. अनुभवातून शिकणे

हे संकट आतापर्यंत आपल्यावर कधीच ओढावले नव्हते. पण आता आपल्याला याचा चांगलाच अनुभव आला आहे. त्यामुळे अशा प्रकारचं संकट पुन्हा आलं तर आपण त्यासाठी तयार असायला हवं. यासाठी सुद्धा आपला एक प्लॅन तयार हवा. यात आपण काही पैसे साठवू शकतो, ठराविक प्रमाणात स्टॉक हाती ठेऊ शकतो, ऑनलाईन बिझनेस वाढवू शकतो किंवा आपल्या व्यवसायाला अनुसरून इतर काही मार्ग सुद्धा शोधू शकतो.

लक्षात ठेवा हे संकट काही फक्त आपल्यावरच आलं नाहीये. पूर्ण जगावर हे संकट आलं आहे. यात शांत राहून विचार करून जो निर्णय घेईल तोच यशस्वी होऊ शकतो.

– शैवाली बर्वे 
shaivalibarve@gmail.com


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख तसेच बातम्या मोफत मिळावा WhatsApp आणि टेलिग्रामवर. WhatsApp : https://bit.ly/2kAPLGD । टेलिग्राम : https://t.me/smartudyojakmedia

WhatsApp chat
error: Content is protected !!